महाराष्ट्राच्या शेती विकासात महत्वपूर्ण योगदान, पद्मश्री बनबिहारी निंबकर यांचे निधन

| Updated on: Aug 25, 2021 | 6:31 PM

फलटण येथील निंबकर अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक, प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री बनबिहारी निंबकर यांचे वयाच्या 90 व्या वर्षी फलटण येथे राहणा-या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.

महाराष्ट्राच्या शेती विकासात महत्वपूर्ण योगदान, पद्मश्री बनबिहारी निंबकर यांचे निधन
B V Nimbkar
Follow us on

सातारा: फलटण येथील निंबकर अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक, प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री बनबिहारी निंबकर यांचे वयाच्या 90 व्या वर्षी फलटण येथे राहणा-या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. सातारा जिल्ह्यातील फलटण येथे बी. व्ही. निंबकर यांनी निंबकर अ‌ॅग्री रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती. निंबकर यांना त्यांच्या कार्याबद्दल पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. पशुपालन आणि शेती क्षेत्रात बी. व्ही. निंबकर यांचं मोठं योगदान होतं.2016 मध्ये त्यांना जमनालाल बजाज पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

फलटण तालुक्यातून काम

बी. व्ही. निंबकर यांचा जन्म 17 जुलै 1931 रोजी गोव्यात झाला होता. बी.व्ही.निंबकर यांचं शिक्षण अमेरिकेत झाल्यानंतर ते भारतात परतले होते. 1956 मध्ये निंबकर यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण तालक्यात शेती करण्यास सुरुवात केली. शेती क्षेत्रातील संशोधनासाठी त्यांना रॉकफेलर फाऊंडेशनं मदत केली. निंबकर यांनी निंबकर सीडस नावानं बियाण्यांचा व्यवसाय सुरु केला होता.

1968 मध्ये ‘नारी’ ची स्थापना

बी.व्ही. निंबकर यांनी निंबकर अ‌ॅग्री रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना 1968 मध्ये केली. शेती क्षेत्रातील संशोधनासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेनं नवीकरणीय ऊर्जा, पशुपालन, शाश्वत विकास या क्षेत्रात काम केलं. निंबकर सीडसच्या वतीनं बोअर शेळीची प्रजाती विकसित करण्यात आली. सानेनचा प्रसार असो की बिना काटेरी करडईचं वाण या क्षेत्रात नारी संस्थेनं मोठं काम केलं.

देशातील आणि महाराष्ट्रातील शेती विकास आणि संशोधनात निंबकरांचं आणि त्यांच्या नारी संस्थेंचं मोठं योगदान होतं. बी.व्ही. निंबकर यांनी 1990 पर्यंत नारी संस्थेचं अध्यक्षणपद भूषवलं. 2009 मध्ये या संस्थेला जागतिक शाश्वत संशोधन पुरसक्रा देण्यात आला होता. निंबकर यांनी त्यांच्या संशोधनाबद्दल विविध लेख लिहिले असून ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना शेती क्षेत्रातील संशोधनाबद्दल भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवलं आहे.

बनबिहारी निंबकर यांच्या पश्चात त्यांची पत्नी, तीन मुली , जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. आपल्या निंबकर कृषी संशोधन संस्थेच्या माध्यमातून शेतीतील प्रगत संशोधनासाठी ते अविरत कार्यरत होते. त्यांच्या विविधांगी कार्याबद्दल सन 2006 साली भारत सरकारकडून त्यांना ‘पद्मश्री’ किताबाने सन्मानित करण्यात आले होते.

इतर बातम्या:

शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश होणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात टोमॅटोचा लाल चिखल, किलोला एक ते दीड रुपया दर, शेतकऱ्यांची परवड सुरुच

Padma shri Awardee B V Nimbkar passes away he contribute in Agriculture with Nimbkar Agri Research Institute