द्राक्षे पिकावर किडीचा प्रादुर्भाव, काय आहे उपाययोजना

| Updated on: Oct 21, 2021 | 3:48 PM

पिकात रोगाचा शिरकाव झाला तर मग द्राक्षे लागवड शेतकऱ्यासाठी तोट्याचे सिद्ध होते. त्यासाठी वेळेवर द्राक्षे पिकात लागलेल्या रोगावर नियंत्रण मिळवणे गरजेचे असते. द्राक्षाला सर्वाधिक धोका असतो तो रोगराईचा. त्याचे नियंत्रण कसे करायचे याची माहिती प्रत्येक शेतकऱ्यास होणे महत्वाचे आहे.

द्राक्षे पिकावर किडीचा प्रादुर्भाव, काय आहे उपाययोजना
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

मुंबई : देशात द्राक्षाचे सर्वाधिक उत्पादन हे महाराष्ट्रात आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यात एकूण उत्पादनाच्या 70 टक्के उत्पादह आहे. शिवाय दिवसेंदिवस द्राक्षाचे क्षेत्र हे वाढत आहे. त्यामुळेच या शहराला वाईन सिटी म्हणून ओळखले जाते. राज्यातील द्राक्ष ही चवीला रुचकर असल्याने त्याच्या मागणीत वाढ होत आहे. राज्यातही चांगली बाजारपेठ उपलब्ध असून निर्यातही मोठ्या प्रमाणात हेत आहे. महाराष्ट्र व्यतिरिक्त कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश,पंजाब, हरियाणा, राजस्थान ह्या राज्यात देखील द्राक्षे लागवड केली जाते.

द्राक्षे लागवड शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पाडते परंतु जर ह्या पिकात रोगाचा शिरकाव झाला तर मग द्राक्षे लागवड शेतकऱ्यासाठी तोट्याचे सिद्ध होते. त्यासाठी वेळेवर द्राक्षे पिकात लागलेल्या रोगावर नियंत्रण मिळवणे गरजेचे असते. द्राक्षाला सर्वाधिक धोका असतो तो रोगराईचा. त्याचे नियंत्रण कसे करायचे याची माहिती प्रत्येक शेतकऱ्यास होणे महत्वाचे आहे.

‘थ्रीप्स’ किडी

थ्रिप्स अंडाकृती, काळ्या रंगाचे लहान किडी असतात ह्या किडी नेहमी पानांच्या खालच्या बाजूला आपली अंडी जमा करतात. निम्फस म्हणजे बाल अवस्थेतील किड आणि प्रौढ अवस्थेतील थ्रीप्स किड दोघेही पानाच्या खालच्या बाजूचा रस चोखतात. थ्रिप्स द्राक्षे पिकाच्या फुलोरावर आणि नवीन येणाऱ्या द्राक्षेच्या घडावर देखील हल्ला करतात. प्रभावित द्राक्षेचे फळ क्रॉकी लेयर विकसित करतात आणि पिकल्यांनंतर ही प्रभावित फळे तपकिरी रंगाची होतात. त्यामुळे उत्पादनावर त्याचा परिणाम होतो.

याचे नियंत्रण करण्यासाठी फॉस्फेमिडियन (0.05%) किंवा मोनोक्रोटोफॉस (0.1%) किंवा मॅलॅथिऑन (0.05%) सारख्या कीटकनाशकांच्या फवारण्या थ्रीप्स किडीचा नायनाट करतात. यामुळे पीकाची हानी कमी होते तर पिकाला फुल लागल्यानंतर आणि फळाच्या वाढीदरम्यान प्रोफिलेक्टिक स्प्रे म्हणजे कीटकनाशक फवारणी करणे आवश्यक आहे
नियंत्रण

लीफ स्पॉट

यामुळे द्राक्षेच्या पत्तीवर गोलाकार किंवा अनियमित आकाराचे गडद तपकिरी किंवा फक्त तपकिरी ठिपके तयार होतात. त्यामुळेच ह्या रोगाला लीफ स्पॉट असे नाव पडले आहे. ह्या गोलाकार ठिपक्यांचा मध्य भाग हा राखाडी रंगाचा असतो. ह्या लीफ स्पॉटचे प्रमाण पिकावर वाढायला लागले की, प्रकाश संश्लेषण क्रियेवर विपरीत परिणाम होतो आणि पिकाच्या वाढीला लागणारं पोषकतत्वे पिकाला मिळत नाहीत व द्राक्षे फळांची वाढ त्यामुळे खुंटते परिणामी ह्यामुळे द्राक्ष उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो.

कसे करावे नियंत्रण

ह्या लीफ स्पॉट रोगाच्या प्रतिबंधासाठी रोगग्रस्त, प्रभावित पाने गोळा करून जाळली पाहिजेत. शिवाय रोगाची लक्षणे दिसताच 3.0 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराइड किंवा 2.5 ग्रॅम झिनेब प्रति लिटर पाण्यात विरघळवून द्रावण तयार करून 10 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. ह्यामुळे ह्या रोगावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते आणि उत्पादन वाढवता येते. (Pest infestation on vineyard, what is the solution?)

संबंधित बातम्या :

यंदा हरभरा क्षेत्रात दुपटीने होणार वाढ, काय आहेत कारणे ?

कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांना बॅंकाकडून पैसे भरण्याचा तगादा ; काय आहे कारण?

तयारी रब्बीची : ‘पेरलं की उगवंतच पण योग्य पेरंल की उत्पादनही वाढतं’