AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांना बॅंकाकडून पैसे भरण्याचा तगादा ; काय आहे कारण?

महाविकास आघाडी सरकारची स्थापना होताच कर्जमुक्तीची घोषणा करण्यात आली होती. तीन लाखापर्यंतचे कर्ज माफ तर जे शेतकरी चालू बाकीत आहेत त्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता या घोषणेला दोन वर्ष उलटली तरी आश्वासनांची पूर्तता ही झालेली नाही.

कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांना बॅंकाकडून पैसे भरण्याचा तगादा ; काय आहे कारण?
Farmer
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Oct 21, 2021 | 1:08 PM
Share

नांदेड : महाविकास आघाडी सरकारची स्थापना होताच कर्जमुक्तीची घोषणा करण्यात आली होती. तीन लाखापर्यंतचे कर्ज माफ तर जे शेतकरी चालू बाकीत आहेत त्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता या घोषणेला दोन वर्ष उलटली तरी आश्वासनांची पूर्तता ही झालेली नाही. शिवाय थकीत व्याजासाठी बॅंका ह्या शेतकऱ्यांना तगादा लावत आहेत. त्यामुळे शेतकरी हे अडचणीत आले आहेत. एकट्या नांदेड जिल्ह्यात 20 हजार शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहेत. तर 15 हजार 98 खातेदार शेतकऱ्यांच्या याद्या ह्या निधिअभावी प्रसिध्दच झालेल्या नाहीत.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्तीची ही अवस्था दोन वर्ष उलटले तरी अशीच आहे. जिल्ह्यातील 20 हजार 900 शेतकरी हे या लाभासाठी पात्र आहेत. पण त्यांची यादीच प्रसिध्द झालेली नाही. त्यामुळे सरकारची घोषणा हवेतच विरली असा सूर आता वाढत आहे. मोठा गाजावाजा करीत ही घोषणा करण्याात आली होती. मात्र, स्थानिक पातळीवर योजनेची अंमलबजावणी ही यशस्वीरित्या झालेली नाही.

आधार नोंदणीचीही अडचण

योजनेत पात्र होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ही बॅंकेत जमा करणे आवश्यक होते. मात्र, नांदेड जिल्ह्यातील तब्बल 5 हजार 802 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण रखडल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. शासनाने निधीची पुर्तता करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. नांदेड जिल्ह्यातील 2 लाख 14 हजार 491 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले. यासाठी 1461 कोटी 36 लाख रुपये निधी अपेक्षीत होता. यापैकी दोन लाख 12 हजार 759 शेतकऱ्यांची कर्जखाती आधार लिंक केली आहेत. तर पोर्टलवर दोन लाख नऊ हजार 99 कर्जखाती अपलोड केली आहेत.

वर्षाखेरीस कर्जमाफी ही पुर्णात्वास येईल

कर्जमाफीतील 500 कोटींची तरतूद न झाल्याने राज्यातील 63 हजार शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित आहेत. मात्र, हा मुद्दा डिसेंबर अखेरीस पर्यंत निकाली काढला जाणार असून या शेतकऱ्यांना रब्बीसाठी पीककर्ज देण्याचे सहकार विभागाच्या वतीने कळवण्यात आले आहे. त्यामुळे दीड वर्षापूर्वी घोषणा करण्यात आलेल्या पीक कर्जमाफीला डिसेंबर महिन्यात पुर्णात्वास येईल अशी अपेक्षा आहे.

नियमित व्याज अदा करुनही शेतकऱ्यांची निराशाच

थकीत शेतकऱ्यांना संपूर्ण पीक कर्जमाफी तर नियमित व्याज अदा करुन चालूमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार देणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना ही रक्कम मिळालेली नसल्याने शेतकरी आता व्याज न अदा करता थकीत राहण्यातच समाधान मागत आहेत. प्रोत्साहनपर 50 हजार रुपये हे शासनाचे धोरण आहे. मात्र, अद्यापर्यंत याअनुशंगाने राज्य सरकारने निधी हा बॅंकेत जमा केला नसल्याने शेतकऱ्य़ांना नियमित व्याज हे भरावेच लागणार असल्याचे बॅंकाकडून सांगितले जात आहे. (Farmers did not get benefits even after completing two years of announcement of waiver scheme)

संबंधित बातम्या :

तयारी रब्बीची : ‘पेरलं की उगवंतच पण योग्य पेरंल की उत्पादनही वाढतं’

लाळ्या-खुरकूताने 35 जनावरे दगावली ; अशी घ्या जनावरांची काळजी

कापूस विका पण गरजेपुरता अन् उरलेल्या कापसाचे ‘सोनं’ करा, शेतकऱ्यांना लाखमोलाचा सल्ला

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...