AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Session | केंद्र सरकारची मोठी तयारी! पावसाळी अधिवेशनात परिसीमन आणि महिला आरक्षण विधेयक पुन्हा मांडणार? - सूत्र

Monsoon Session | केंद्र सरकारची मोठी तयारी! पावसाळी अधिवेशनात परिसीमन आणि महिला आरक्षण विधेयक पुन्हा मांडणार? – सूत्र

| Updated on: Jul 18, 2026 | 10:52 AM
Share

केंद्र सरकारच्या पावसाळी अधिवेशनात दोन महत्त्वाच्या विधेयकांबाबत मोठी हालचाल सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. परिसीमन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयक पुन्हा संसदेत मांडण्याची तयारी सरकारने सुरू केल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत या दोन्ही विधेयकांबाबत चर्चा करण्यात आली.

केंद्र सरकारच्या पावसाळी अधिवेशनात दोन महत्त्वाच्या विधेयकांबाबत मोठी हालचाल सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. परिसीमन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयक पुन्हा संसदेत मांडण्याची तयारी सरकारने सुरू केल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत या दोन्ही विधेयकांबाबत चर्चा करण्यात आली. आगामी संसदीय अधिवेशनात ही विधेयके मांडण्यासंदर्भात प्राथमिक स्तरावर निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, ही विधेयके संसदेत मंजूर करून घेण्यासाठी सरकारकडून व्यापक रणनीती आखली जात आहे. यासाठी केंद्रातील विविध मंत्र्यांवर इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधण्याची आणि आवश्यक पाठिंबा मिळवण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. संसदेत या विधेयकांवर व्यापक चर्चा होण्याची शक्यता असून, त्यासाठी सरकारकडून राजकीय पातळीवर हालचालींना वेग देण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, या संदर्भात केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसून, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजकीय घडामोडींना वेग आल्याचे चित्र आहे.

Published on: Jul 18, 2026 10:52 AM

Follow Us