AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan Yojana: गुडन्यूज! पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता लवकरच खात्यात, लक्षात ठेवा ही तारीख… पीएम मोदींच्या हस्ते होणार वितरण

PM Kisan 23rd Installment Date: आता शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. मशागतीला वेग आला आहे. दमदार पाऊस झाला की शेतकरी पेरणीला सुरूवात करेल. त्याला सरकारकडून लवकरच छोटीशी आर्थिक मदत मिळणार आहे. पीएम किसान योजनेचा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे.

PM Kisan Yojana: गुडन्यूज! पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता लवकरच खात्यात, लक्षात ठेवा ही तारीख... पीएम मोदींच्या हस्ते होणार वितरण
पीएम किसान योजना २३ वा हप्ताImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 07, 2026 | 11:33 AM
Share

PM Kisan 23rd Installment Date: शेतीची मशागत झाली असून आता पेरणीची प्रतिक्षा आहे. मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर आहे. आता बी-बियाणे आणि खतासाठी शेतकरी तजवीज करत आहे. त्याला सरकारकडून एक छोटीशी आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. या विशेष तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पीएम किसानचा 23 वा हप्ता शेतकऱ्यांना वितरीत करतील. 13 मार्च रोजी या योजनेचा 22 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता. तर आता या तारखेला हा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

18 जून रोजी जमा होणार हप्ता?

काही दाव्यांनुसार, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 23 वा हप्ता (PM Kisan Yojana 23rd Installment) 18 जून रोजी येऊ शकतो. पण सरकारतर्फे अद्याप याविषयीची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून ही घोषणा करण्यात येते. त्यामुळे जोपर्यंत अधिकृत तारीख समोर येत नाही, तोपर्यंत याविषयी काहीही सांगता येत नाही.

ही तारीख चर्चेत येण्यामागे मागील हप्ता जमा होण्याचे कनेक्शन आहे. 2024 मध्ये 18 जून रोजी 17 वा हप्ता जमा करण्यात आला होता. त्यावेळी देशातील 9.26 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 20,000 कोटी रुपये जमा करण्यात आले होते. त्यामुळे यंदा 18 जून रोजी 23 वा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता शेतकऱ्यांना सरकारच्या अधिकृत घोषणेची प्रतिक्षा आहे.

23 व्या हप्त्यासाठी स्टेटस कसे तपासावे?

23 वा हप्ता जमा होणार की नाही हे तपासण्यासाठी शेतकऱ्यांनी अगोदर स्टेट्‍स तपासणे आवश्यक आहे. त्यासाठी pmkisan.gov.in या पोर्टलवर जाऊन फार्मर कॉर्नरवर लॉगिन करावे. ‘Know Your Status’ हा पर्याय निवडून स्टेट्‍स चेक करा. यामध्ये जर तुमच्या नावासमोर काही त्रुटी दाखवत असतील तर ती अगोदर दूर करा. ‘Land Seeding’ वा ‘e-KYC’ समोर ‘No’ असे लिहिलेले असेल तर लगेचच जवळच्या CSC केंद्रावर जाऊन ही माहिती ताबडतोब अपडेट करा. त्यामुळे तुमचा पीएम किसानचा हप्ता थांबणार नाही.

शेतकरी त्यांच्या मोबाईलवरून सुद्धा फार्मर कॉर्नरवर एडिट अथवा अपडेट करू शकतात. त्यांनी या साईटवर आधार, बँकेचा तपशील हा पर्याय निवडावा. तिथे तुमचे योग्य नाव, बँकेचा योग्य खाते क्रमांक, IFSC क्रमांक टाकावा. त्यानंतर ही माहिती योग्य आहे की नाही याचा पडताळा करावा आणि अखेरीस सबमिट बटण दाबावे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात