AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar:… तर सत्ताधाऱ्यांना किंमत मोजावी लागेल…गॅस दरवाढीचा भडका… शरद पवारांचा थेट इशारा

Sharad Pawar on LPG Price Hike: पेट्रोल आणि डिझेलनंतर अपेक्षेप्रमाणे गॅस दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसला. महागाईने आता सामान्य जनता बेजार आणि हैराण झाली आहे. या दरवाढीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे.

Sharad Pawar:... तर सत्ताधाऱ्यांना किंमत मोजावी लागेल...गॅस दरवाढीचा भडका... शरद पवारांचा थेट इशारा
गॅस दरवाढीवरून शरद पवार यांचा सत्ताधाऱ्यांना मोठा इशारा Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jun 07, 2026 | 10:59 AM
Share

Sharad Pawar on Gas Cylinder Price Hike: मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करण्यात आली होती. त्यानंतर गॅस दरवाढ होण्याची शक्यता होती. ही कसरही आज भरून काढण्यात आली. गॅस सिलेंडर थेट 29 रुपयांनी महागला. इंधन दरवाढीने महागाईचा भस्मासूर सर्वसामान्यांच्या मानगुटीवर बसला आहे. जनता या दरवाढीने हैराण आणि बेजार झाली आहे. विरोधक या दरवाढीविरोधात आंदोलन करत आहेत. तर सामान्य माणसाला संसाराचा गाडा कसा ओढावा याची चिंता लागली आहे. त्याचवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या दरवाढीवरून सरकारला मोठा इशारा दिला आहे.

शरद पवार यांचा सरकारला मोठा इशारा

शरद पवार हे आज बारामती दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. काल पावसामुळे त्या भागात शेतकऱ्यांचं नुकसान झाले. त्याचा पाहणी दौरा होणार असल्याचे समजते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. एलपीजी सिलेंडर महागल्याप्रकरणी त्यांनी प्रतिक्रिया दिली.

हे असंच चालणार, हे दर वाढतात. दर वाढवत असताना. वाढवतच नेले. या सर्व गोष्टीचा परिणाम आज सामान्य माणसाच्या प्रपंचावर आहे. पंतप्रधानांनी सुरुवातीला सांगितलं, की आम्ही महागाई नियंत्रित करतोय. नियंत्रित याचा अर्थ टप्प्याटप्प्याने हा धक्का द्यायचा हे त्यांचं सूत्र आहे. आणि त्याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळेला कळेल, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.

घरगुती गॅस महागाईचा स्फोट

देशभरात घरगुती गॅस सिलेंडरच्या महागाईचा स्फोट झाला आहे. सामान्य जनतेला पुन्हा एकदा झटका बसला आहे. घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 29 रुपयांनी वाढली आहे. नवीन दर तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहे. या नवीन दरवाढीमुळे दिल्लीत 14.2 किलोचे गॅस सिलेंडर 942 रुपयांना मिळत आहे. तर मुंबईत हा भाव 941.40 रुपये, कोलकत्तामध्ये 968 रुपये, चेन्नईमध्ये 957 रुपये, बेंगळुरू शहरात 944.50 रुपये असा झाला आहे.

मार्च महिन्यात 60 रुपयांची दरवाढ

सरकारी तेल विपणन कंपन्यांच्या माहितीनुसार, जागतिक बाजारात कच्चे तेल आणि इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे कंपन्यांना घरगुती गॅस विक्रीवर सातत्याने नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे किंमतीत वाढ करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी तोटा भरून काढण्यासाठी आज 7 जून रोजी 29 रुपयांनी एलपीजी किंमत वाढवली. तर दोन महिन्यांपूर्वी याच तारखेला, 7 मार्च रोजी सिलेंडरच्या किंमतीत 60 रुपयांची दरवाढ करण्यात आली होती. म्हणजे दोन महिन्यात जनतेच्या खिशावर जवळपास 90 रुपयांचा बोजा पडला आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात