55 हजार शेतकऱ्यांना मिळणार नाही PM Kisan योजनेचे पैसे, जाणून घ्या कारण?

| Updated on: Oct 09, 2021 | 9:48 AM

उत्तर प्रदेशातील बरेलीत 55,243 अपात्र शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे लाटत असल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे आता या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले जाणार नाहीत. सप्टेंबर महिन्यात जिल्हा स्तरावर तपास करण्यात आला. | Farmers

55 हजार शेतकऱ्यांना मिळणार नाही PM Kisan योजनेचे पैसे, जाणून घ्या कारण?
नरेंद्र मोदी आणि शेतकरी
Follow us on

नवी दिल्ली: केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरु केल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे ( PM Kisan samman nidhi scheme) दहाव्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार, याची सर्वजण वाट पाहत आहेत. गेल्या काही काळात काही बोगस शेतकऱ्यांनीही या योजनेतील पैसे लाटल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर केंद्र सरकारने शेतकऱ्यांची पडताळणी सुरु केली होती. या तपासणीदरम्यान अपात्र असूनही योजनेते पैसे लाटणाऱ्यांकडून ते पुन्हा वसूल केले जात आहेत.

उत्तर प्रदेशातील बरेलीत 55,243 अपात्र शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे लाटत असल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे आता या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले जाणार नाहीत. सप्टेंबर महिन्यात जिल्हा स्तरावर तपास करण्यात आला. ज्यामध्ये ही फसवणूक उघडकीस आली. या प्रकरणात अपात्रांना जिल्हा कृषी विभागाच्या वतीने वसुली नोटीसा दिल्या जात आहेत. वसुलीनंतर हा पैसा सरकारच्या तिजोरीत जमा होईल.

नक्की काय आहे प्रकरण?

शेतकरी असल्याचं खोटं सांगत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Scheme) फायदा घेणाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली होती. या योजनेतील लाभार्थींची तपासणी सुरू झाली होती. गावागावात जाऊन याबाबत चौकशी होणार आहे. विशेष म्हणजे खोटी माहिती देऊन या योजनेंतर्गत शेतीसाठीची वार्षिक 6 हजाराची मदत घेणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. त्यांची मदत बंद तर केली जाईलच, मात्र सोबत याआधी मिळवलेल्या पैशांचीही भरपाई करुन घेण्यात येणार आहे. या योजनेत 5 टक्के लाभार्थ्यांची प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन तपासणी करण्याची तरतूद आहे. त्याचीच आता अंमलबजावणी सुरू आहे.

उत्तर प्रदेशामधील गोरखपूर जिल्ह्यात अशाप्रकारे बोगस शेतकऱ्यांची तपासणी करण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार कृषी विभागातील अधिकारी गावा-गावात जाऊन या लाभार्थी यादीची पाहणी करुन सत्यता तपासत आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील 5 टक्के लाभार्थ्यांची यादी तयार झालीय. यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना ही यादी देऊन लाभार्थींचे नाव, मोबाईल नंबर आणि आधार कार्डची (Aadhaar Card) सत्यता तपासली जाईल. तसेच ते शेतकरी आहेत की नाही हेही पाहिलं जाईल. या तपासणीत ज्यांची माहिती खोटी सापडेल त्यांची मदत तातडीने बंद करण्यात येईल.

संबंधित बातम्या:

दोन वर्षांपासून रखडलेला पीक विमा मिळणार पुढच्या वर्षी, उच्च न्यायालयाचे आदेश

शेतकऱ्याला हमीभावाचा आधार, राज्यात मूग-उडदाच्या खरेदी केंद्राला परवानगी

Special Story ! टोकण पध्दतीने सोयाबीनचे भरघोस उत्पादन, काय आहे टोकण पध्दत ?