PM Kisan 20th Installment : केवळ इतके दिवस उरलेत, या दिवशी जमा होणार पीएम किसानचा हप्ता, लवकर उरकून घ्या हे काम

20th Installment of PM Kisan : पीएम किसान योजनेचा हप्ता जून महिन्यात जमा झाला नाही. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा 20 वा हप्ता जुलै महिन्याच्या या तारखेला जमा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहार दौऱ्यावेळी हा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.

PM Kisan 20th Installment : केवळ इतके दिवस उरलेत, या दिवशी जमा होणार पीएम किसानचा हप्ता, लवकर उरकून घ्या हे काम
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता या दिवशी जमा होणार
| Updated on: Jul 04, 2025 | 12:09 PM

PM Kisan Scheme : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता कधी जमा होणार याविषयीची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. पावसाने ओढ दिली आहे. काही ठिकाणी पेरण्या झाल्या तर काही ठिकाणी पेरण्या रखडल्या आहेत. काही पट्ट्यात दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. अशावेळी निदान 2 हजार का असेनात पण आर्थिक हातभार लागेल म्हणून कास्तकार 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा करत आहेत.

कधी मिळणार हप्ता?

पीएम किसान योजनेचा हप्ता जून महिन्याच्या अखेरीस मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण हा हप्ता अद्याप जमा झालेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 18 जुलै रोजी बिहार दौऱ्यावर आहेत. मोतीहारी येथे त्यांची सभा आहे. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी कळ दाबून शेतकऱ्यांच्या खात्यात डिजिटल पद्धतीने पैसे जमा करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे येत्या 18 जुलै रोजी पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. अद्याप सरकारने याविषयीची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का?

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता पात्र शेतकर्‍यांना मिळेल, ज्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत नसेल त्यांना फायदा होणार नाही. तुम्हाला फायदा होईल की नाही हे घर बसल्या तपासता येईल. pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा. शेतकरी कॉर्नर या पर्यायावर जा. लाभार्थ्यांच्या यादीवर जा. तुमचा आधार क्रमाक, खाते क्रमांक नोंदवा. “Get Data” वर क्लिक करा. पेमेंट स्टेट्स चेक करा.

येथे करा तक्रार

ई-केवायसी पूर्ण झाला असेल तर लाभार्थ्याला रक्कम मिळण्यास अडचण येत नाही. खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. तरच खात्यात पैसा येईल. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेविषयी काही अडचण असल्यास शेतकर्‍यांनी हेल्पलाईन क्रमांक 1800-115-5525 वर संपर्क करावा. PM Kisan हेल्पलाईन 155261 वा 011-24300606 येथे कॉल करावा.

आता एकाच व्यक्तीला लाभ

पीएम किसान योजनेतंर्गत नियमात अजून एक मोठा बदल करण्यात आला आहे. या नवीन नियमानुसार, कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असतील तर एकालाच लाभ घेता येणार आहे. इतर सदस्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. पीएम किसान योजनेबाबत केंद्र सरकारची नवीन नियमावली समोर आली आहे. यामध्ये लाभार्थ्यांविषयीच्या नियमात बदल झाले आहेत.