तयारी रब्बी हंगामाची ; ज्वारी उत्पादन वाढीसाठी अशी करा पुर्वतयारी

| Updated on: Sep 17, 2021 | 2:45 PM

उत्पादन वाढीच्या अनुशंगाने शेतकऱ्यांकडून योग्य प्रणाली ही राबवली जात नाही. यंदा निसर्गाच्या अवकृपेमुळे खरिप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. तर आता हेच नुकसान रब्बीतून भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य पध्दतीने पुर्वतयारी करणे आवश्यक झाले आहे. त्याअनुशंगाने महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ज्वारीचे उत्पादन कसे वाढवायचे याबाबत सुचना केल्या आहेत.

तयारी रब्बी हंगामाची ; ज्वारी उत्पादन वाढीसाठी अशी करा पुर्वतयारी
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

अहमदनगर : आजही केवळ नियोजनाअभावी शेतकऱ्यांचे उत्पादन हे घटत आहे. उत्पादन वाढीच्या अनुशंगाने शेतकऱ्यांकडून योग्य प्रणाली ही राबवली जात नाही. यंदा निसर्गाच्या अवकृपेमुळे खरिप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. तर आता हेच नुकसान रब्बीतून भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य पध्दतीने पुर्वतयारी करणे आवश्यक झाले आहे. त्याअनुशंगाने महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ज्वारीचे उत्पादन कसे वाढवायचे याबाबत सुचना केल्या आहेत. त्याचा अवलंब केल्यात उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.

मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात रब्बी हंगामातील ज्वारी हे मुख्य पिक आहे. कमी पावसामध्येही योग्य नियोजन केल्यास शेतकऱ्यांना उत्पादन हे वाढविता येणार आहे. याकरिता ज्वारीची पेरणी ही योग्य वेळेत होणे आवश्यक आहे. ज्वारीची पेरणी ही 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोंबर या काळात होणे आवश्यक आहे. पेरणीपासून मशागत आणि घ्यावयाची काळजी याबाबत महात्मा फुले कृषी विद्यापीठातील डॅा. सुरज गडाख यांनी उपयु्क्त माहिती शेकऱ्यांना दिलेली आहे.

खरिप आणि रब्बी हंगामातही शेतकऱ्यांचे हे योग्य नियोजन नसते. याचा परिणाम पुढे उत्पादनावरही होतो. त्यामुळे वेळेवर पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुर्वमशागतीमध्ये जमिनीची खोल अशी नांगरट करणे आवश्यक आहे. यानंतर पावसाळ्याच्या शेवटी शेत जमिनीत चौकणी वाफे केल्याने पावसाचे पाणी हे वावरात मुरते याचा ज्वारी वाढीसाठी फायदा होणार आहे. मशागतीच्या दरम्यान पाऊत झाला असल्यास शेत जमिनीवरील ढेकळे विरघळलेली असतील तर विरघळलेली नसल्यास ती शेतकऱ्यांना फोडून घ्यावी लागणार आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांना मशागतीमध्ये तीन ते चार वेळा पाळी ही घालावीच लागणार आहे. त्यामुळे सुपिक जमिन तयार होणार आहे. शेवटच्या पाळीच्या दरम्यान हेक्टरी 10 ते 12 बैलगाड्या हे शेनखत टाकावे लागणार आहे.

जमिनीत पाणी मुरण्याच्या हेतूने उभी आणि आडवी पाळी घालणे आवश्यक असल्याचे विद्यापीठातील डॅा. गडाख यांनी सांगितले आहे. मशागतीच्या दरम्यान पाणी मुरवण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांचे प्रयत्न हे गरजेचे आहेत. पावसाचे पाणी मुरवण्यासाठी शेत जमिनीची तशी बांधणी करावी लागणार आहे. पेरणीपुरर्वीची मशागतच उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना उपयोगी ठरणार आहे.

अशी करा पुर्वतयारी

शेत जमिनीची मशागत झाल्यानंतर मजुराच्या सहाय्याने 10 बाय 10 चौ.मी आकाराचे वाफे तयार करणे आवश्यक आहे. 2.70 मीटर अंतरावर सारा पाडून घेऊन 20 मीटर अंतरावर नांगराच्या सहाय्याने दंड काढणे गरजेचे आहे. त्यामुळे मशागतीनंतर पाणी साठण्यास मदत होणार आहे. त्यामुळे खरीप हंगाम संपताच थेट रब्बीची पेरणी केल्याने उत्पादनात घट होण्याचा धोका असल्याचेही गडाख यांनी सांगितले आहे.

मराठवाड्यातील ज्वारी हे मुख्य पिक

खरिपात सोयाबीन तर रब्बीत ज्वारी हे मुख्य पिक आहे. दिवसेंदिवस ज्वारीचे ऊत्पन्न हे वाढत असले तरी योग्य दर हा मिळत नाही. मात्र, जनावरांना कडब्याच्या माध्यमातून चारा होतो त्यामुळे शेतकऱ्यांचा ज्वारी पेरणीकडे कल राहिलेला आहे. त्यामुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ज्वारी सुधार प्रकल्पाच्या तज्ञांचे मार्गदर्शनाने पेरा केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे.

इतर बातम्या :

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानाच अर्थ काय?; प्रविण दरेकरांनी मांडल्या दोन थिअरी!

“कदाचित मंत्री रावसाहेब दानवे यांना शिवसेनेत यायचं असेल”

मराठवाड्याचा कायापालट घडवणाऱ्या प्रकल्पांची वेळेत अंमलबजावणी करणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही