
Agristack App Registration: शेतकर्यांसाठी राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याची घोषणा केली. पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांना डिजिटल नोंदणी प्रक्रियेतून जावे लागेल. त्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. तरच शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमाफी मिळणार आहे. दोन लाखांच्यावर पीक कर्ज असणार्या शेतकर्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो. पण त्यासाठी त्यांना अट पूर्ण करावी लागणार आहे.
‘ॲग्रीस्टॅक’ ॲपवर करावी लागेल नोंदणी
कर्जमाफी योजनेचा फायदा मिळण्यासाठी शेतकर्यांना डिजिटल नोंदणी करणे आवश्यक आहे. सरकारी योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकर्यांना अगोदर ‘ॲग्रीस्टॅक’ ॲपवर नोंदणी करावी लागेल. सरकारी योजनेच्या लाभासाठी ‘ॲग्रीस्टॅक’ ॲपवर विहित पद्धतीने नोंदणी करावी लागेल. यामध्ये शेतकर्यांना त्यांचे नाव, शेतजमीन, प्रकार याची माहिती द्यावी लागेल. पंतप्रधान शेतकरी सन्माननिधी योजनेचा लाभही शेतकर्यांना मिळेल.पण अगोदर ही डिजिटल नोंदणी करणे आवश्यक आहे.
‘ॲग्रीस्टॅक’ ॲपवर विविध कृषी योजना, अनुदान आणि कर्जमाफीसाठी डिजिटल डेटाबेस तयार करण्यात येत आहे. या प्रणालीत शेतकर्यांची संपूर्ण माहिती नोंदवली जाईल. पण अनेक शेतकर्यांनी अजून नोंदणी न केल्याने त्यांच्या कर्जमाफीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
कर्जमाफी मिळणार कशी?
‘ॲग्रीस्टॅक’ ॲपवर अनेक शेतकर्यांना भविष्यातील कर्जमाफी आणि पंतप्रधान सन्माननिधी योजनेचा लाभासह इतर अनेक सरकारी योजनांसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी अचूक माहिती डिजिटल स्वरुपात नोंदवणे आवश्यक आहे. अनेक जिल्ह्यात ‘ॲग्रीस्टॅक’वरील नोंदणीसाठी शिबिर घेण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी या ‘ॲग्रीस्टॅक’ ॲपवर नोंदणी केलेली नाही. त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. बोगस लाभार्थी हुडकण्यासाठी आणि त्यांना पायबंद घालण्यासाठी ही नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
शेतकर्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे जाहीर
गेल्या शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. त्यानुसार, 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकर्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. शेतकऱ्यांचे कर्जमाफ होईल. तर नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. त्याचा शेतकर्यांना मोठा फायदा होईल. पीक कर्ज दिलेल्या सर्व बँकांतील दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे.