पावसाने हंगामाच बदलला, आंब्याला मोहोर बहरण्याऐवजी फुटतेय पालवी

| Updated on: Dec 04, 2021 | 12:00 PM

यंदा हिवाळ्यात पावसाळ्याची अनुभूती घ्यावी लागत आहे तर दुसरीकडे ज्या दिवसांमध्ये आंब्याला मोहोर लागण्याची वेळ असते तिथे आता पालवी फुटू लागली आहे. अजब प्रकार आहे निसर्गाचा यापूर्वी अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पाण्यात गेला आता अवकाळीमुळे संबंध फळबागा धोक्यात आहेत.

पावसाने हंगामाच बदलला, आंब्याला मोहोर बहरण्याऐवजी फुटतेय पालवी
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

खंडाळा : यंदा हिवाळ्यात पावसाळ्याची अनुभूती घ्यावी लागत आहे तर दुसरीकडे ज्या दिवसांमध्ये आंब्याला मोहोर लागण्याची वेळ असते तिथे आता पालवी फुटू लागली आहे. अजब प्रकार आहे निसर्गाचा यापूर्वी अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पाण्यात गेला आता अवकाळीमुळे संबंध फळबागा धोक्यात आहेत. आंब्याला मोहोर लागल्यानंतर कैऱ्या लागतात पण वातावरणामुळे आता पालवीच फुटू लागली आहे.त्यामुळे आंब्याचा हंगाम तर लांबणीवर पडणारच आहे पण उत्पादनातही मोठी घट होणार आहे.

…म्हणून मोहोर लांबणीवर

यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे आंब्याला अद्यापही मोहोर लागलेला नाही. कारण त्यासाठी अनुकूल वातावरणच तयार झालेले नाही. मोहोर लागण्यासाठी पावसाने उघडीप दिल्यानंतर झाडाच्या मुळाशी पाण्याचा ताण पडणे गरजचे असते. दरवर्षी, सप्टेंबरमध्ये पावसाने उघडीप दिल्यानंतर ऑक्टोबर हिटमध्ये जमिनीतील ओलावा कमी होतो. आंब्याच्या मुळाशी पाण्याचा ताण वाढतो आणि मग कलम केलेल्या मोहोर लागतो पण यंदा डिसेंबर उजाडला तरी पावसामध्ये सातत्य असल्याने मोहोरच लागला नाही.

उत्पादनात घट अन खर्चात वाढ

सततच्या वातावरण बदलाचा परिणाम हा फळबागांवर झालाच आहे. आता ते न भरून निघणारे नुकसान आहे. पण अवकाळी पावसामुळे पुन्हा औषध फवारणीचा खर्चात वाढ होत आहे. कारण पावसाने उघडीप दिली की कीडनाशक आणि बुरशीनाशक हे एकत्र करून फवारणी करणे आवश्यक आहे तर फळ पदरी पडणार आहे.त्यामुळे यंदा उत्पादन कमी आणि खर्च अधिक झाला आहे. जिरायत शेतीप्रमाणेच फळबागायत शेतकऱ्यांची अवस्था ही झालेली आहे.

 

शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी

दरवर्षी, वातावरणातील बदलाचा परिणाम कोकणातील फलबागांवर होत आहे. ऐन थंडीच्या मोसमात अवकाळी ही नित्याचीच झाली आहे. त्यामुळे काजू, आंबा या फळबागा धोक्यात आहेत. अवकाळीमुळे मोहोर गळत असल्याने उत्पादनात मोठी घट होत असल्याने नुकसानभरपाईची मागणी येथील शेतकरी करीत आहेत.

कोकणचा वाली कोण?

मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्ती आली की मदतीसाठी अनेकांकडून पुढाकार घेतला जातो. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी सर्वपक्ष एकत्र येतात पण कोकणातील बागायत शेतकऱ्यांसाठी कोणी पुढाकार घेत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस नुकसानीच्या झळा अधिक तीव्र होत आहेत.

आवक वाढली तर दरही घटणार

दरवर्षी मार्च पासून आंब्याचा हंगाम सुरू होत असतो. पण यंदाचे चित्र हे वेगळे आहे. आंब्याचा हंगाम एप्रिल-मे मध्ये जाणार आहे.त्यामुळे केवळ 60 दिवसाचा हंगाम राहणार असल्याने बाजारात अचानक अवाक वाढली तर त्याचा परिणाम हा आंब्याच्या दरावर होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

संबंधित बातम्या :

अशी ही माणुसकी, जे सरकार करु शकले नाही ते साखर कारखानदाराने करुन दाखविले..!

Smart Farmer: नांदेडच्या शेतकऱ्यांना कळाले योजनेचे महत्व, एका महिन्यात कोट्यावधींचा विजबिल भरणा, जाणून घ्या काय आहे योजना?

अवकाळी पावसात 2 हजार जनावरे दगावली, राज्य सरकारकडून पशूपालकांना मिळणार आर्थिक मदत