रत्नागिरी हापूस आंबा आता थेट इंग्लड आणि कतारला जाणार, सातशे डझन आंब्याच्या निर्यातीची तयारी

| Updated on: Mar 23, 2021 | 2:50 PM

फळांचा राजा अर्थात हापूस आंब्याची (Alphonso Mango) निर्यात इंग्लड आणि कतारला केली जाणार आहे.

रत्नागिरी हापूस आंबा आता थेट इंग्लड आणि कतारला जाणार, सातशे डझन आंब्याच्या निर्यातीची तयारी
रत्नागिरी हापूस
Follow us on

रत्नागिरी: फळांचा राजा अर्थात हापूस आंबा (Alphonso Mango) निर्यातीसाठी तयार झाला आहे. रत्नागिरी हापूस आता थेट इंग्लड आणि कतारला जाणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील तीन बागायतदारांच्या बागेतील आंबा निर्यात करण्यात येणार आहे. सातशे डझन आंबा निर्यात केला जाणार असल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांकडून आंबा निर्यातीची तयारी करण्यात येत आहे. ( Ratnagiri Alphonso Mango will be export to England and Katar)

सातशे डझन हापूस आंब्याची निर्यात

कोरोनामुळे निर्यातीवर संकट आलं असलं तरी त्यातून मार्ग काढत रत्नागिरी हापूस आंबा निर्यात करण्यात येणार आहे. सुमारे सातशे डझन हापूस आंबा प्रकिया केंद्रात दाखल झालाय. या हंगामातील पहिली शिपमेट २६ मार्चला जाणार आहे.

वातानुकुलीत गाडीतून आंबा मुंबईत दाखल होणार

रत्नागिरी हापूस आंब्याची निर्यात करण्यासाठी कोरोना काळात निर्यातीच्या आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत. आंबा प्रकिया झाल्यानंतर पॅकिग करून वातानुकुलीत व्हॅनमधून हा आंबा मुंबईत जाईल आणि तेथून हा आंबा विमानाने परदेशात पाठवला जाणार आहे.

नवी मुंबई बाजारपेठेतही आंब्याची आवक वाढली

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ मार्केटमध्ये आंब्याची बंपर आवक झाली होती. त्यामुळे दरात घसरण झाली आहे. फळ मार्केटमध्ये 15 मार्चला 500 गाड्यांची आवक झाली होती. त्यातून जवळपास तेवीस हजार पेटी आंबा मार्केटमध्ये आला होता. देवगड हापूस पाच डझनाच्या पेटीला आठशे ते अडीच हजार रुपये भाव आहे. रत्नागिरी हापूस आंबा बाजारात दिवसेंदिवस वाढत चालला असून लवकरच आंबा सामान्य नागरिकांच्या आवाक्यात येईल, असा अंदाज आहे. फळांच्या राज्याला मात्र मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे आंबा आवक जास्त प्रमाणात आली तरी मालाला उठाव राहणार असून सामान्य माणूस दहा दिवसात आंबा खाऊ शकेल असे व्यापारी वसंत चासकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

यंदाच्या हंगामातली पहिला हापूस आंबा पुणे मार्केटात दाखल, पेटीचा भाव 25 हजार रुपये

कोकणावरील संकटांची मालिका सुरुच, निसर्ग चक्रीवादळानंतर अवकाळी पावसानं हापूस धोक्यात, मच्छीमारही संकटात

( Ratnagiri Alphonso Mango will be export to England and Katar)