Chilly Rate: लाल मिरचीचा ठसका 25 हजार रुपये क्विंटल पार, ‘तेजा’ चीही तेजी कायम..!

| Updated on: Feb 14, 2022 | 4:45 AM

शेतीमालाच्या दरात चढ-उतार होत असले तरी यंदा भाजीपाल्याने शेतकऱ्यांना तारलेले आहे. त्यामुळे यंदा मुख्य पिकांपेक्षा हंगामी पिकांनाच अधिकचे महत्व आले आहे. यासर्वामध्ये मिरची उत्पादक शेतकऱ्यांचा आनंद तर द्विगुणीत झाला आहे. कारण नंदुरबार येथे लाल मिरचीला 16 हजार रुपये क्विटलचा तर तेलंगणातील अनुममुला बाजारपेठेत तर लाल मिरचीला विक्रमी दर मिळालेला आहे. तब्बल 25 हजार रुपये क्विंटलचा दर मिळत आहे.

Chilly Rate: लाल मिरचीचा ठसका 25 हजार रुपये क्विंटल पार, तेजा चीही तेजी कायम..!
बाजार समितीमध्ये लाल मिरचीची विक्रमी दर मिळत आहे. उत्पादन घटल्यामुळे दर वाढले आहेत.
Follow us on

मुंबई : शेतीमालाच्या दरात चढ-उतार होत असले तरी यंदा भाजीपाल्याने शेतकऱ्यांना तारलेले आहे. त्यामुळे यंदा मुख्य पिकांपेक्षा हंगामी पिकांनाच अधिकचे महत्व आले आहे. यासर्वामध्ये (Chilly Growers) मिरची उत्पादक शेतकऱ्यांचा आनंद तर द्विगुणीत झाला आहे. कारण (Nandurbar Market) नंदुरबार येथे लाल मिरचीला 16 हजार रुपये क्विटलचा तर तेलंगणातील अनुममुला बाजारपेठेत तर लाल मिरचीला विक्रमी दर मिळालेला आहे. तब्बल 25 हजार रुपये क्विंटलचा (Chilly Rate) दर मिळत आहे.अशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून अनुममुला बाजारपेठेचा उल्लेख केला जातो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दरामध्ये दुप्पट वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे तेजा मिरचीही तेजीत आहे. कारण या वाणाच्या मिरचीलाही 16 हजार रुपये क्विंटलचा दर मिळत आहे. आवक कमी झाल्यामुळे मिरचीच्या दराचा ठसका उठला आहे. शिवाय भविष्यात दरात अणखीन वाढ होणार असल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत. वारंगलच्या बाजारात लाल मिरचीच्या ‘यूएस 341’ या प्रीमियम वाणाचा भाव 25 हजार रुपये आहे जो विक्रमी मानला जात आहे.

सध्या चांदी भविष्यातील दराची धास्ती

तेलंगणात लाल मिरचीची संपूर्ण काढणी अजून सुरू झालेली नाही. याच परस्थितीचा फायदा इतर भागातील शेतकरी घेत आहेत. पुढील काही दिवस लाल मिरचीचे भाव चढेच राहतील, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. तेलंगणा राज्यात मिरची तोडणीला सुरुवात होताच भाव कोसळतील. पण गेल्या वर्षीच्या तुलनेत दर अधिकचे राहणार हे नक्की आहे. त्यामुळे उत्पादन काही प्रमाणात घटले असले तरी यंदाच्या विक्रमी दरामुळे शेतकऱ्यांनाच फायदा होणार हे नक्की मानले जात आहे.

वेगवेगळ्या वाणांच्या मिरचीचे दर

मिरचीच्या वाणाप्रमाणे सध्या बाजारात दर आहेत. त्याप्रमाणे तेजा मिरचीला 16 हजार ते 18 हजार 800 पर्यंतचा दर आहे. त्याचबरोबर वंडर हॉट वाणाच्या मिरचीला 17 हजार ते 22 हजार 500 रुपये किंमतीला विक्री होत आहे. लाल मिरचीच्या 1048 वाणांला 16 हजार ते 19 हजार रुपये क्विंटल तर ‘344’ वाणांचा भाव 15 ते 18 हजार रुपयांच्या दरम्यान आहे. त्याचबरोबर टोमॅटोच्या आकारातील लाल मिरचीला क्विंटलमागे 22 ते 25 हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. गेल्या वर्षी याच वेळी या वाणाची किंमत 13 ते 16 हजारांच्या दरम्यान होती.

देश-विदेशात मिरचीची निर्यात

टोमॅटोच्या आकाराच्या लाल मिरची प्रमाणेच ‘341’ वाणाच्या मिरचीने उच्चांकी दर मिळला आहे. सध्या 25 हजारांच्या भावात त्याची विक्री सुरू आहे. शुक्रवारपर्यंत तेजा जातीच्या लाल मिरचीच्या 5 हजार, वंडर हॉटच्या 800 पिशव्या आणि ‘यूएस 341’ च्या 3 हजार पिशव्या बाजारात आल्या होत्या. अनुममुला मार्केट यार्डात व्यापार होणाऱ्या लाल मिरचीची निर्यात बहुतांशी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व देशातील इतर राज्यांत केली जाते. शिवाय इतर देशांना निर्यातही केली जाते.

नंदुरबारमध्येही मिरचीच्या दरात वाढ

नंदुरबार बाजार समितीमध्ये मिरचीच्या भावामध्ये चांगल्या प्रकारची तेजी आली आहे. सध्या मिरची हंगाम हा शेवटच्या टप्प्यात आहे. नंदुरबार बाजार समिती मधील मिरचीच्या भावाचा विचार केला तर सध्या येथे लाल मिरचीला 7 हजार रुपयांचा भाव मिळत आहे तर कोरडी लाल मिरचीने 16 हजारांचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत जवळजवळ एक लाख 65 क्विंटल मिरची खरेदी चा टप्पा पार केला असून येत्या काही दिवसात ही बाजार समिती मिरची खरेदी चा दोन लाखाचा टप्पा देखील पार करेल असा एक अंदाज आहे.

संबंधित बातम्या :

कोरफडची एकदा लागवड बारमाही उत्पन्न, शेतकऱ्यांना व्यवसयाचीही संधी, जाणून घ्या सर्वकाही

Cotton Crop: कापसाचा दुहेरी फायदा, शेतकऱ्यांना वाढीव दर अन् बाजार समित्यांच्या उत्पादनातही भर..!

महाबळेश्वरचीच स्ट्रॉबेरी पाहिजे, मग आता नाही होणार फसवणूक..! कृषी पणन मंडळाचा रामबाण उपाय