आता आस्मानी नव्हे सुलतानी संकट, रब्बीचे पीक बहरात असतानाच केंद्र सरकारच्या निर्णयाचा फटका

आता शेतकऱ्यांसमोर संकट उभे टाकले आहे ते खताचे. पिकाची जोमात वाढ होण्यासाठी रासायनिक खत आवश्यक आहे. मात्र, खताच्या दरात वाढ आणि भासत असलेला तुटवडा यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. ऐन रब्बीचा हंगाम सुरु झाला की ज्याची मागणी अधिक त्याच खताच तुटवडा हे ठरलेले आहे. शिवाय खतांच्या किमंतीमध्येही 100 ते 200 रुपयांनी वाढ झाली आहे.

आता आस्मानी नव्हे सुलतानी संकट, रब्बीचे पीक बहरात असतानाच केंद्र सरकारच्या निर्णयाचा फटका
रासायनिक खत, संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 11, 2021 | 10:39 AM

अहमदनगर : सबंध खरीप हंगामावर आस्मानी संकट ओढावले होते. हंगामाच्या सुरवातीपासूनच पावसाने अवेळी हजेरी लावल्याने उत्पादनात मोठी घट झाली होती. मात्र, सरासरीपेक्षा अधिकच्या पावसाचा (Rabi season) रब्बी हंगामात चांगलाच फायदा होत आहे. मात्र, आता शेतकऱ्यांसमोर संकट उभे टाकले आहे ते खताचे. पिकाची जोमात वाढ होण्यासाठी (shortage of fertilizers) रासायनिक खत आवश्यक आहे. मात्र, रासायनिक खतांच्या दरात वाढ आणि भासत असलेला तुटवडा यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. ऐन रब्बीचा हंगाम सुरु झाला की ज्याची मागणी अधिक त्याच खताच तुटवडा हे ठरलेले आहे. शिवाय खतांच्या किमंतीमध्येही 100 ते 200 रुपयांनी वाढ झाली आहे.

कोणत्या खतांची होतेय मागणी?

रब्बी हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मध्यंतरीच्या अवकाळी पावसामुळे रब्बीतील पिके जोमात आहेत. त्यामुळे त्यांची वाढ अधिक जोमात होण्याच्या अनुशंगाने 10-26-26 या रासायनिक खताची मागणी वाढत आहे. मात्र, याच खताच्या किंमतीमध्ये तर वाढ झालीच आहे शिवाय तुटवडाही असल्याने शेतीकामे ही खोळंबलेली आहेत. मध्यंतरी पाऊस झाल्याने आता रब्बी हंगामातील पिकांसाठी खताच्या मागणीत वाढ होत आहे. परंतू, केंद्र सरकारने खतांच्या आयातीमध्ये 20 टक्के कपात केली असल्याचा परिणाम आता बाजारपेठेत जाणवत आहे. शिवाय मागणी अधिक व पुरवठा कमी असल्याने व्यापारी आता मनमानी किंमत करीत आहेत.

कसे वाढले रासायनिक खतांचे दर?

रासायनिक खतांच्या प्रत्येक बॅग मागे गतवर्षीच्या तुलनेत 100 ते 200 रुपयांनी वाढ झाली आहे. गतवर्षी 10-26-26 या रासायनिक खताची बॅग ही 1175 रुपयांनी मिळत होती तीच आज 1450 वर गेलेली आहे. 15-15-15 हे खत गतवर्षी 1180 रुपायांना बॅंग मिळत होती तर आता 1350 रुपये याची किमंत झाली आहे. सर्वाधिक प्रमाणात वापरले जाणारे 18-18-10 या खताच्या किंमतीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत 75 रुपयांनी वाढ झाली आहे.

आता शेतकऱ्यांकडे पर्यायच नाही

18:46 हे खत जरी सहज उपलब्ध नाही त्यामुळे कृषी विभागाने 10:26:26, 12:32:16, 15:15, 20: 20: 00 या खतांचा पर्यांय शेतकऱ्यांसमोर ठेवला होता. मात्र आता या पर्यांयी खतांच्या किंतीमध्येही वाढ झाली आहे शिवाय तुटवडाही भासत आहे. ही खते जरी कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली असली तरी बाजारपेठेत मिळतच नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. या खतांमध्ये नायट्रोजन, फॅास्परस यांचे मिश्रण करुनही वापर करता येत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

ऊसातील तणामुळे दुहेरी नुकसान, वेळीच बंदोबस्त केला तर उत्पादनात होणार वाढ

थंडीमध्ये जनावरांची ‘अशी’ काळजी घ्या, गोष्टी छोट्याच पण आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या..!

Pik Vima : अखेर पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरवात, ज्यांना अडचण आहे त्यांचे काय?