हरभरा उत्पादन वाढीची सोपी पध्दत, तंत्रज्ञान वापराचा शेतकऱ्यांना दुहेरी फायदा, वाचा सविस्तर

| Updated on: Feb 07, 2022 | 4:30 AM

पिकाची उत्पादकता ही बियाणांवर आणि व्यवस्थापनावरच अवलंबून आहे. त्यामुळे पेरणी करताना योग्य वाणाची निवड शेतकऱ्यांनी केली तरच भविष्यात उत्पादन वाढीसाठी फायद्याचे ठरणार आहे. पेरणी दरम्यानच उत्पादन आणि काढणीसाठी यंत्राचा वापर या गोष्टी शेतकऱ्यांनी ठरवून घेतल्या तर अधिकचा फायदा होणार आहे.

हरभरा उत्पादन वाढीची सोपी पध्दत, तंत्रज्ञान वापराचा शेतकऱ्यांना दुहेरी फायदा, वाचा सविस्तर
उन्हाळी हंगामातील हरभरा पीक
Follow us on

लातूर : पिकाची उत्पादकता ही बियाणांवर आणि व्यवस्थापनावरच अवलंबून आहे. त्यामुळे पेरणी करताना योग्य वाणाची निवड शेतकऱ्यांनी केली तरच भविष्यात उत्पादन वाढीसाठी फायद्याचे ठरणार आहे. (Sowing) पेरणी दरम्यानच उत्पादन आणि काढणीसाठी यंत्राचा वापर या गोष्टी शेतकऱ्यांनी ठरवून घेतल्या तर अधिकचा फायदा होणार आहे. त्यामुळे (Mechanization) यांत्रिकिकरणाचा वापर करुन हरभऱ्याचे अधिकचे उत्पादन घ्यावयाचे झाल्यास शेतकऱ्यांनी फुले विक्रम या (Improved varieties) सुधारित वाणाची निवड करावी. कारण हे वाण सरळ वाढते आणि काढणीसाठी यंत्राचा वापर करता येतो तर पेरणीसाठी दोन ओळीतील अंतर हे 30 सेमी ठेवणे आवश्यक आहे. पेरणी दरम्यान, बिजप्रक्रिया आणि त्यानंतर एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन असल्याचा सल्ला खरपूडी येथील कृषी विज्ञान केंद्राचे कृषितज्ञ डॉ. प्रशांत पगार यांनी दिला आहे.

फुले वाणाचा असा हा फायदा..

सुधारित वाणाचा वापर झाला तर उत्पादनात वाढ होते. शिवाय फुले विक्रम असे वाण आहे ज्याची वाढ सरळ होते. या सुधारित वाणाची यांत्रिकिकरणाद्वारे कापणीही करता येते. हे वाण जमिनीवर पसरणारे नाही तर उभट वाढणारे आहे. तर इतर सुधारित वाण आकाश, जॅकी 9218, दिग्विजय हे वाण पसरणारे शिवाय कमी उंचीचे असते त्यामुळे यंत्राच्या माध्यमातून त्याची काढणी होत नाही. यंत्राद्वारे काढणीसाठी कमी खर्च लागतो. योग्य पाण्याचे व्यवस्थापन, बिजप्रक्रिया, एकात्मिक व्यवस्थापन याचा योग्य पध्दतीने अवलंब केल्यास उत्पादनात वाढ निश्चित होणार आहे.

घाटेअळीसाठी कामगंध सापळेच महत्वाचे

हरभरा पीक ऐन बहरात असतानाच घाटीअळीचा प्रादुर्भाव वाढतो. योग्य वेळी बंदोबस्त केला नाही तर मग ही अळी घाटे पोखरुन टाकते तर त्यामुळे उत्पादन घट होते. त्यामुळे घाटे लागण्याच्या अवस्थेत हरभरा पिकाची पाहणी करणे आणि अळीचा प्रादुर्भाव सुरु होताच कामगंध सापळे लावणे गरजेचे आहे. यामुळे अळी तर नियंत्रणात येतेच पण रासायनिक किटकनाशकावर होणार खर्चही टळला जाणार आहे. त्यामुळे यंदा उन्हाळी हंगामातील मुख्य पीक असलेल्या हरभऱ्याची शेतकऱ्यांनी योग्या काळजी घेतली तर उत्पादनात वाढ होणार असल्याचा अंदाज कृषितज्ञ पगारे यांनी व्यक्त केला आहे.

अधिकच्या उत्पादनासाठी ही पध्दत ठरणार उपयोगी

कमी क्षेत्रात अधिकच्या उत्पादनासाठी एक ना अनेक प्रयोग राबवले जात आहे. सध्या नव्याने सर्वच पीके ही रुंद सरी वरंबा या पध्दतीने लावण्याचे आवाहन केले जात आहे. गतवर्षी सोयाबीनसाठीही असाच प्रयोग करण्यात आला होता. उत्पादनवाढीतून याचा फायदा शेतकऱ्यांना झालेला आहे. त्याचप्रमाणे हरभऱ्याच्या उत्पादनवाढीसाठी रुंद सरी वरंबा पध्दतीने जोडअळीची लागवड करुन उत्पादनात वाढ करता येत असल्याचे कृषितज्ञ पंडीत वासरे यांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या :

बीडच्या शेतकऱ्याचा नादच खुळा : पठ्ठ्याने तीन वर्ष परीश्रम केले पण पाणी टंचाईवर कायमचा तोडगाच काढला

Soybean: हंगाम अंतिम टप्प्यात, तरीही शेतकऱ्यांच्या काय आहेत अपेक्षा?

नगदी पिकांना कोरोनाचा फटका, व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याने कलिंगड वावरातच