PM Kisan Yojna: प्रतिक्षा संपली, चालू आठवड्यातच पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर!

| Updated on: May 02, 2022 | 3:48 PM

पीएम किसान ही देशातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी योजना आहे. वर्षभरात शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. त्याअनुशंगाने आतापर्यंत 11 कोटी शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी झाली आहे. 11 व्या हप्त्यासाठी 22 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे लागणार आहेत.

PM Kisan Yojna: प्रतिक्षा संपली, चालू आठवड्यातच पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर!
PM kisan yojna
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : (PM Kisan Yojna) पीएम किसान योजनेचा 10 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊन 4 महिने उलटले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना 11 व्या हप्त्याचे वेध लागले होते. 11 वा हप्ता जमा होण्यापूर्वी (Farmer) शेतकऱ्यांना अनेक नियम-अटींचे पालन करावे लागले आहे. आता प्रक्रिया पूर्ण झाली असून चालू आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हजार रुपये जमा होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. याकरिता (Central Government) केंद्र सरकारने अक्षय तृतीयाचे मुहूर्त साधल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर ही रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. सध्या सरकारने ‘किसान भागीदारी-प्राथमिकता हमारी’ हा कार्यक्रम सुरु केला आहे. ज्याअंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळणार आहे. योगायोगाने ही योजना आता पीएम किसान योजनेशी जोडली गेली आहे. ही मोहीम संपल्यानंतर आता सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करणार आहे.

11 कोटी शेतकऱ्यांना 11 वा हप्ता

पीएम किसान ही देशातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी योजना आहे. वर्षभरात शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. त्याअनुशंगाने आतापर्यंत 11 कोटी शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी झाली आहे. 11 व्या हप्त्यासाठी 22 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे लागणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले रेकॉर्ड तपासणे गरजेचे आहे. त्यामुळे यामधील अडचणी शेतकऱ्यांच्या लक्षात येणार आहेत. देशात सर्वाधिक लाभार्थी हे उत्तर प्रदेशातील आहेत.

असे तपासा आपले रेकॉर्ड..

11 वा हप्ता खात्यावर जमा होण्यापूर्वी शेतकऱ्यांना आपले खाते तपासावे लागणार आहे. त्यामुळे काही अडचण असल्यास योग्य ती उपाययोजना करता येणार आहे.
* सर्वात अगोदर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या अधिकृत म्हणजेच pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावे लागणार आहे.
* यावर तुमच्या डाव्या बाजूला ‘Farmer Corner’ यावर क्लिक करावे लागणार आहे. यामध्ये (Beneficiary Status) यावर क्लिक करावे लागणार आहे.
* यामध्ये आधार क्रमांक टाकून तुम्ही तुमचे रेकॉर्ड तपासू शकता. काही अडचण असेल तर ती शोधून काढली जाईल. अन्यथा अडचण आली नाही तर आधीच्या हप्त्याचे पैसे दिसतील.
* ‘Farmer Corner’ मध्येच Beneficiaries list मध्ये क्लिक करून तुम्ही तुमच्या संपूर्ण गावातील लाभार्थ्यांच्या यादीतही तुमचे नाव पाहू शकता. यामध्ये शासनाने सर्व लाभार्थ्यांची संपूर्ण यादी अपलोड केली आहे.

हे सुद्धा वाचा

हेल्पलाईनवर लागणार प्रश्न मार्गी

या लिंकमध्ये शेतकऱ्यांच्या सोयीसाठी हेल्पलाईन नंबरही देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला या योजनेशी संबंधित काही अडचण असल्यास तुम्ही थेट केंद्रीय कृषी मंत्रालयाशीही संपर्क साधू शकता. PM-Kisan Helpline Number 155261 आणि 011-24300606 असा आहे.