PM Kisan : आठव्या हफ्त्याचे 2000 रुपये पाठविण्याची तयारी पूर्ण, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचेल ही रक्कम

| Updated on: Apr 19, 2021 | 4:09 PM

केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी म्हणतात की एप्रिल अखेरपर्यंत सर्व शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 2000 रुपयांचा हप्ता जमा होईल. (The eighth installment of Rs 2,000 is ready to be sent and will soon reach the farmers' accounts)

PM Kisan : आठव्या हफ्त्याचे 2000 रुपये पाठविण्याची तयारी पूर्ण, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचेल ही रक्कम
आठव्या हफ्त्याचे 2000 रुपये पाठविण्याची तयारी पूर्ण
Follow us on

नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Scheme)च्या आठव्या हप्त्याचे 2000 रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचणार आहेत. मात्र, अद्याप याच्या तारखेबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी म्हणतात की एप्रिल अखेरपर्यंत सर्व शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 2000 रुपयांचा हप्ता जमा होईल. आम्ही तुम्हाला सांगतो की पंतप्रधान किसान योजनेंतर्गत सरकार वर्षामध्ये तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देते. (The eighth installment of Rs 2,000 is ready to be sent and will soon reach the farmers’ accounts)

कधी येणार खात्यात पैसे?

टीव्ही 9 ला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी सरकार एकाच वेळी सुमारे 10 कोटी शेतकर्‍यांना 20 हजार कोटी रुपये जाहीर करेल. कृषी मंत्रालयाने आपल्या वतीने सर्व कामे पूर्ण केली आहेत. पंतप्रधानांचा कार्यक्रम घेण्यास उशीर झाला आहे. पीएम किसान योजनेंतर्गत वर्षाकाठी 65 हजार कोटी रुपयांचे बजेट आहे. अखेर 25 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच वेळी 9 कोटी शेतकऱ्यांसाठी पैसे जाहीर केले. इतर लोकांची पडताळणी होताच पैसे पाठविण्यात आले.

महत्त्वाच्या गोष्टी

– या योजनेचा लाभ मिळण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत हप्त्याचा लाभ घेण्यासाठी तयार केलेल्या नियमांनुसार शेतकर्‍याच्या नावे शेती असणे आवश्यक आहे.

– जमीन जर शेतकऱ्याच्या आजोबा किंवा वडिलांच्या नावावर असेल तर योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍याच्या नावे शेती जमीन असणे आवश्यक आहे.

– या योजनेत आयकर विवरणपत्र भरणारे, डॉक्टर, वकिल इत्यादींना या योजनेतून वगळण्यात आले आहे. वेबसाइटवर गेल्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या फार्मर्स कॉर्नरवर क्लिक करा. यानंतर, लाभार्थी स्थिती(Beneficiary Status) पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर एक नवीन पृष्ठ उघडेल.

– आता आपला आधार नंबर, मोबाइल नंबर प्रविष्ट करा. यानंतर, आपल्याला आपल्या स्थितीबद्दल पूर्ण माहिती मिळेल.

– पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी आपण घरून नोंदणी करू शकता. यासाठी आपल्याकडे आपल्या शेताची खातौनी, आधार कार्ड, मोबाइल नंबर आणि बँक खाते क्रमांक असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही पंतप्रधान किसान योजनेच्या pmkisan.nic.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करू शकता. (The eighth installment of Rs 2,000 is ready to be sent and will soon reach the farmers’ accounts)

इतर बातम्या

Gold Price: दागिन्यांच्या दुकानात सोन्याचे भाव वेगळे का असतात?, जाणून घ्या ‘कारण’

‘क्राईम पेट्रोल’मधील किस्से सांगून आत्महत्येचा भास, 28 वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी भाऊ-वडील गजाआड