Nandurbar : पावसाची प्रतिक्षा संपली, आता पेरणीची लगबग, बियाणे-खतांसाठी शेतकऱ्यांची वर्दळ

| Updated on: Jul 09, 2022 | 12:12 PM

कडधान्य पेऱ्याचा कालावधी उलटून गेला आहे. आता उडीद, मुगाचा पेरा झाला तरी उत्पादनात मात्र घट होणार अहे. त्यामुळे शेतकरी आता थेट सोयाबीन आणि कापसावर भर देत आहेत .सोयाबीनसह कापूस, तूर, धान पिकाचा पेरा हा 15 जुलैपर्यंत झाला तरी उत्पादनात घट होणार नसल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.

Nandurbar : पावसाची प्रतिक्षा संपली, आता पेरणीची लगबग, बियाणे-खतांसाठी शेतकऱ्यांची वर्दळ
नंदुहबार जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावल्याने बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नंदुरबार : हंगामाच्या सुरवातीपासून उत्तर महाराष्ट्रात वरुणराजाची कृपादृष्टी राहिली असली तरी (Nandurbar) नंदुरबार जिल्हा अपवाद होता. मात्र, शुक्रवारी पावसाने हजेरी लावल्याने (Kharif Season) खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. एकूणच सव्वा महिन्याच्या प्रतीक्षेनंतर नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे रखडलेली कामे आता मार्गी लागणार आहेत तर पेरणी कामांनाही वेग येणार असल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. हंगामाच्या सुरवातीलाच (Market) बाजारपेठेत खत, बियाणे दाखल झाले होते. पण महागडी बियाणे खरेदी करायचीच कशाला असा सवाल शेतकऱ्यांपुढे होता. मात्र, आता चित्र बदलल्याने नंदुरबार शहादा नवापूर तळोदा अक्कलकुवा या शहरात कृषी सेवा केंद्रांव खत बियाणे आणि विविध शेती उपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी सकाळपासूनच गर्दी करत आहेत.

बाजारपेठेत शेतकऱ्यांची गर्दी

पावसाने ओढ दिल्याचा परिणाम थेट बाजारपेठेवरही झाला होता. पाऊसच गायब झाल्याने बियाणांची खरेदी करावी की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांमध्ये नंदुरबार जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने बाजारपेठेमध्येदेखील नवचैतन्य निर्माण झाले आहे. खतासह बियाणांची खरेदी केली जात आहे. अगोदरच पेरणी कामांना उशीर झाला आहे. त्यामुळे आता वाफसा होताच पेरणी कामांना वेग येणार आहे. खत-बियाणांबरोबर शेती साहित्यही खरेदीसाठी गर्दी होत आहे. खत-बियाणांमधून शेतकऱ्यांची लूट होऊ नये म्हणून तालुकानिहाय कृषी विभागाने भरारी पथकाची नेमणूक केली आहे.

शेतकऱ्यांचा भर सोयाबीन, कापसावर

कडधान्य पेऱ्याचा कालावधी उलटून गेला आहे. आता उडीद, मुगाचा पेरा झाला तरी उत्पादनात मात्र घट होणार अहे. त्यामुळे शेतकरी आता थेट सोयाबीन आणि कापसावर भर देत आहेत .सोयाबीनसह कापूस, तूर, धान पिकाचा पेरा हा 15 जुलैपर्यंत झाला तरी उत्पादनात घट होणार नसल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. त्यामुळे शेतकरी आता सोयाबीन आणि कापसावर भर देत आहेत. शिवाय कमी कालावधीत येणाऱ्या वाणावर शेतकरी लक्ष केंद्रीत केले आहे.

हे सुद्धा वाचा

कृषी विभागाचा काय सल्ला?

खरिपाची पेरणी करावी धावून अशी म्हण आहे. पण यंदा पावसाअभावी नंदुरबार जिल्ह्यातील पेरण्या रखडल्या आहेत. आता पावसाने हजेरी लावली आहे मात्र, पेरणीबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलेला सल्लाही महत्वाचा ठरणार आहे. आता पेरणीला उशीर झाला आहे. त्यामुळे उत्पादनावर तर काही परिणाम होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई गडबडीत पेरणी न करता किमान 75 ते 100 मिमी पावसाची नोंद झाल्याशिवाय पेरणी करु नये असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.