Garlic : पांढरा नव्हे गुलाबी लसूण खा, विशेषता आणि फायदे जाणून व्हालं दंग

| Updated on: May 29, 2023 | 6:50 PM

या गुलाबी लसणाची उत्पादन क्षमता पारंपरिक लसणापेक्षा जास्त आहे. औषधीय गुणधर्मही या गुलाबी लसणात भरपूर आहेत. नव्या गुलाबी लसणात सल्फर आणि अँटिऑक्सिडेंची गुणवत्ता चांगली आहे.

Garlic : पांढरा नव्हे गुलाबी लसूण खा, विशेषता आणि फायदे जाणून व्हालं दंग
Follow us on

नवी दिल्ली : लसणाची शेती भारतभर केली जाते. नियमित लसणाचे सेवन केल्याने निरोगी राहता येते. फॉस्फरस, मॅग्नीज, जस्त, कॅल्शियम, व्हिटामीन सी, व्हिटामीन बी ६ आणि आयर्न मोठ्या प्रमाणात लसणात असतात. याशिवाय प्रोटीन, कार्बोहायड्रेट, पँटोथेनिक अॅसिड, थियामीनही लसणात असते. लवकरच तुम्ही गुलाबी लसणाचा स्वाद घेऊ शकाल. कारण बिहारच्या कृषी विद्यापीठ सबौरने गुलाबी लसणाची नवी जात विकसित केली आहे.

 

अँटिऑक्सिडेंटची गुणवत्ता चांगली

या गुलाबी लसणाची उत्पादन क्षमता पारंपरिक लसणापेक्षा जास्त आहे. औषधीय गुणधर्मही या गुलाबी लसणात भरपूर आहेत. नव्या गुलाबी लसणात सल्फर आणि अँटिऑक्सिडेंटची गुणवत्ता चांगली आहे. पांढऱ्या लसणाच्या तुलनेत गुलाबी लसूण जास्त कालावधीपर्यंत घरी ठेवला जाऊ शकतो. शिवाय न्यूट्रीशन आणि पोटॅशीयमही अधिक आहे.

हे सुद्धा वाचा

गुलाबी लसूण लवकर खराब होणार नाही

संशोधन टीमच्या प्रमुख संगीता यांनी सांगितलं की, अशा प्रकारच्या लसणासाठी गेल्या ९ वर्षांपासून काम सुरू आहे. खूप मेहनतीनंतर यात यश मिळाले आहे. गुलाबी लसणाच्या कव्हरची जाडी पांढऱ्या लसणाऱ्या तुलनेत जास्त असते. गुलाबी लसूण लवकर खराब होत नाही.

 

आता शेतकरी करणार गुलाबी लसणाची शेती

गुलाबी लसणाबाबत बिहार सरकारशी संशोधकांचे बोलणे झाले आहे. शेतीसाठी ही प्रजाती लवकरच उपलब्ध होणार आहे. यानंतर शेतकरी गुलाबी लसणाची शेती करू शकतात. याचे बीज शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाईल.

गुलाब लसणात रोगप्रतिकारकशक्ती पांढऱ्या लसणाच्या तुलनेत जास्त असते. सबौर विद्यापीठात १ लसणातील सल्फर आणि फास्फरसची चाचणी करण्यात आली. हे घटन शरीरासाठी आवश्यक आहेत. गुलाबी लसणाला सहसा रोग होत नाही.