
मुंबई : रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असून आता खरिपाचे वेध लागले आहेत. मराठवाड्यात ज्याप्रमाणे सोयाबीन हे खरिपातील मुख्य पीक आहे त्याचप्रमाणे विदर्भात आणि देशाच्या इतर भागात धान शेती अर्थाच (Rice Crop) भाताचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदाही देशाच्या मोठ्या भागात धानाची पेरणी आणि प्रत्यारोपण केले जाणार आहे, मात्र येत्या (Kharif Season) खरीप हंगामात शेतकऱ्यांना भात पेरणी आणि रोपलावणीसाठी अतिरिक्त संधी उपलब्ध होणार आहेत. यंदा खरीपातील (Production Increase) उत्पादन वाढवण्याची संधी शेतकऱ्यांकडे असणार आहे. यामध्ये भाताच्या दोन नव्या जातींचे लागवडही शेतकऱ्यांना करता येणार आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेने हे वाण विकसित केले असून यामुळे उत्पादन कसे वाढणार आहे याची माहिती प्रत्येक शेतकऱ्यास असणे तेवढेच गरजेचे आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषदेने गेली 8 वर्ष मेहनत घेऊन जे भाताचे वाण तयार केले आहे त्याचे नाव हे गोल्डन अॅडव्हान्स असे आहे. गेल्या वर्षी हे वाण प्रदर्शित करण्यात आले असले तरी यंदाच्या खरिपापासून ते प्रत्यक्ष वापरासाठी येणार आहे. या वाणाचा पेरा झाला केला तर चार महिन्यामध्ये पीक शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे. विशेष म्हणजे या वाणाची उत्पादकता ही इतरांच्या तुलनेने अधिक आहे. संशोधन परिषदेच्या अंदाजानुसार या वाणामुळे एकरी 55 क्विंटल उत्पादन मिळेल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे. शिवाय वातावरणातील बदलाचा या वाणावर अधिकचा परिणाम होणार नाही तर याकरिता पाणीही कमी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये या वाणामुळे बदल होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
भौगोलिक परस्थितीचा विचार करुन हे वाण विकसित करण्यात आले आहे. नावाप्रमाणेच शेतकऱ्यांना या वाणातून अॅडव्हान्स उत्पादन मिळणार आहे. आयसीएआर ने दिलेल्या माहितीनुसार हे गोल्डन वाण श्रेणीसुधार केलेले आहे. बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि ओडिशामधील शेतकरी हे या वाणाची लागवड करु शकणार आहेत. एकंदरीत, आयसीएआरने या प्रदेशांची वैशिष्ट्ये आणि गरजा लक्षात घेऊन गोल्ड अॅडव्हान्स्ड व्हरायटी विकसित केली आहे. 10 ते 15 जून दरम्यान या वाणाची पेरणी करता येईल.
आयसीएआरने विकसित केलेल्या धानाची दुसरी जात म्हणजे सोन्याचे कोरडे धान. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारत सरकारने भाताचे वाण प्रसिद्ध केले होते. ज्याअंतर्गत यंदाच्या खरीप हंगामात प्रथमच शेतकऱ्यांना या जातीच्या भाताची लागवड करता येणार आहे. उत्तर प्रदेशातील पर्जन्यछायेच्या जमिनीसाठी ते अतिशय प्रभावी आहे. गोल्ड़न वाण हे पर्जन्य छायेच्या भागात अधिक परिणामकारक राहणार आहे. उत्तर प्रदेशातील दुष्काळग्रस्त पर्जन्यछायेच्या भागात पेरली जाऊ शकते. आयसीएआरच्या मते, या जातीच्या धानाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याचा उपयोग पर्जन्यछायेच्या जमिनीत थेट पेरणीसाठी केला जाऊ शकतो. एक हेक्टरमध्ये या वाणाची लागवड केल्यास 30 ते 40 क्विंटल उत्पादन मिळू शकते शिवाय 110 ते 115 दिवसांमध्ये हे पीक पदरात पडते.