Maharashtra weather | अवकाळी पावसामुळे दिलासा, तर काही लोकांचं नुकसान, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील इवळेश्वर गावाला वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपून काढलंय. या गारपिटीने गावातील कच्च्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. इवळेश्वर गावावर अर्ध्यातासांहून अधिक काळ ही गारपीट झाली.

Maharashtra weather | अवकाळी पावसामुळे दिलासा, तर काही लोकांचं नुकसान, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
unseasonal rain washim photo
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 22, 2023 | 12:51 PM

महाराष्ट्र : राज्यात अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने (unseasonal rain) नुसता हौदोस घातला आहे. दिवसभर कडक उन्ह आणि रात्रीच्या दरम्यान अवकाळी पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांचं (farmer) मोठं नुकसान होत आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे जामनेर पाळधी शिवारात शेकडो हेक्टर पिके आडवी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान प्रशासनास नुकसानीची माहिती देऊनही प्रशासनाकडून पंचनामे करण्यास दिरंगाई केली जात असल्याने शेतकऱ्यांनी संताप (Maharashtra weather) व्यक्त केला आहे.

नायगांव तालुक्यात पावसाची हजेरी

नांदेड जिल्ह्यातील नायगांव तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. अचानकपणे आलेल्या या पावसाने नायगांव तालुक्यात नागरिकांची चांगलीच धांदल उडाली, मात्र चाळीस अंश तापमानाच्या ळा सोसत असलेल्या नागरिकांना या अवकाळी पावसापासून काहीसा दिलासा मिळालाय. या पावसाने वातावरणातला उकाडा कमी झालाय मात्र काही प्रमाणात पिकांचे नुकसान देखील झालेय.

इवळेश्वर गावाला गारपिटीने झोडपले

नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील इवळेश्वर गावाला वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपून काढलंय. या गारपिटीने गावातील कच्च्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. इवळेश्वर गावावर अर्ध्यातासांहून अधिक काळ ही गारपीट झाली. त्यात गावातील काहीजण गारपिटीने किरकोळ जखमी देखील झाले आहेत. त्याचबरोबर उन्हाळी पिकांचे देखील मोठे नुकसान झालेय.

किनवट तालुक्यातील काही गावात वादळी वाऱ्यासह गारपीट

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात तुफान वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे, अवकाळी पावसासह गारपिटीचा ही तडाखा काही गावांना बसला. काल संध्याकाळी मांडवा, बेल्लारी, दिगडी, नागझरी, घोटी सह काही गावात अवकाळी पाउस आणि ही गारपिट झालीय. सध्या शेतात मोठ्या प्रमाणात पिके नसली तरी तीळ आणि ज्वारीचे काही प्रमाणात नुकसान होणार आहे.

जामनेर पाळधी शिवारात विजेच्या कडकडासह अवकाळी पावसासह जोरदार वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान गहू हरभरा मका काढणीला आलेल्या पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातात तोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरवला आहे.