AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather : राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, शेती पिकांना मोठा फटका

Maharashtra weather : राज्यात सगळीकडे मुसळधार पाऊस झाला आहे. अवकाळी पाऊस अनेक जिल्ह्यात झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी अतिशय वाईट ठरला आहे.

Weather : राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, शेती पिकांना मोठा फटका
unseasonal rain Image Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 22, 2023 | 11:44 AM
Share

पुसद : पुसद (pusad) तालुक्यात प्रचंड वादळी वारे व गारपीट व मुसळधार पावसाने (unseasonal rain) थैमान घातले असून परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पुसद परिसरात दिवसभर उष्ण वातावरण होतं. अचानक संध्याकाळी सुमारे साडेचारच्या सुमारास प्रचंड वादळी वारे व मेघगरजेनेसह पावसाला सुरुवात झाली. माळ पठारावरील अनेक गावात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. हळद उत्पादक शेतकरी (Turmeric producing farmer) हवालदिल झालेला असून भाजी वर्गीय पीक घेणारे शेतकरी मात्र पुरते पीक नष्ट झाल्याने हतबल झाले आहे. माळ पठारावरील रोहडा येथील विठ्ठल किसन पोपळघट यांच्या सुमारे 25 एकरातील तीळ, उडीद, टरबूज आणि टमाटे ही पिके सुमारे पाच मिनिटे पडलेल्या गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेली आहेत.

टमाट्याचे व हळदीचे प्रचंड नुकसान

गजानन तुकाराम पांगसे यांच्या सुमारे 18 ते 19 एकर जमिनीत फळभाजी पिकांचे याच प्रकारे नुकसान झाले असून गावातील दत्ता पोपळघट, गोविंद पोपळघट ,रामकिसन कानडे,रामजी भोने ,विठ्ठलराव वाढवे तसेच हळद उत्पादक राजकुमार परिस्कर यांचे टमाट्याचे व हळदीचे प्रचंड नुकसान झाले असून सचिन हरीमकर, गजानन हरीमकर यांचे सुद्धा त्याच प्रकारे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील चिकणी, हुडी या गावात व परिसरात सुद्धा वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला असून तालुक्यातील आंबा व लिंबू तसेच संत्रा पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. हीच परिस्थिती तालुक्यातील भोजला, वनवारला, वालतुर, पार्डि, निंबी याही भागात झाली असून शेतकऱ्यांच्या या प्रचंड नुकसानामुळे तालुक्यातील शेतकरी हतबल झाला आहे. तालुक्यातून नगदी पैसे देणारा आंबा उत्पादक शेतकरी या प्रचंड वादळी वाऱ्यामुळे पूर्णपणे हतबल झाला असून सर्वच पिकांचे नुकसान झाल्याने खरिपातील दुष्काळ आणि रब्बीतील हे नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकरी प्रचंड प्रमाणात हवालदिल झाला असून शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी अशी मागणी अनेक शेतकऱ्यांकडून होत आहे.

राज्यात सगळीकडे मुसळधार पाऊस झाला आहे. अवकाळी पाऊस अनेक जिल्ह्यात झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी अतिशय वाईट ठरला आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.