पाऊस लांबल्याने शेतकरी संकटात, पिकांनी माना टाकल्या, पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू

| Updated on: Jul 07, 2021 | 3:24 PM

मध्यंतरी पेरणी योग्य पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली. तर, सध्या जिल्ह्यातील विविध भागांत डवरणीच्या कामाला गती आली आहे.

पाऊस लांबल्याने शेतकरी संकटात, पिकांनी माना टाकल्या, पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

वर्धा: मध्यंतरी पेरणी योग्य पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली. तर, सध्या जिल्ह्यातील विविध भागांत डवरणीच्या कामाला गती आली आहे. शेतकरी जरी शेतीच्या कामांना लागला असला तरी मागील दहा दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. सोयाबीन कपाशी आणि तुरीचं पिकं संकटात आलं आहे. (Wardha Farmers facing problems due to lack of Monsoon rain in district)

पिकांनी माना टाकल्या

सध्याच्या पीक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सोयाबीन, कपाशी तर तुरीचे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मागील महिन्यात दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील विविध भागांत थांबून थांबून पावसाच्या सरी बरसल्या. पाऊसच बेपत्ता झाल्याने, तसेच सध्या ऊनही तापत असल्याने बारा ते पंधरा दिवसांचे अंकुरलेले पीक माना टाकत आहे.

84.57 टक्के क्षेत्रावर पेरण्या

जिल्ह्यात खरिप हंगामासाठी 4 लाख 48 हजार 756 हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे.यापैकी 3 लाख 79 हजार 503 हेक्टरवर पेरण्या आटोपल्या असून 84.57 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यंदा सर्वाधिक 2 लाख 33 हजार 77 हेक्टरवर कापूस पिकांचा पेरा आहे. तर 1 लाख 13 हजार 833 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे.पावसाने सध्या दडी दिली आहे यामुळे काही प्रमाणात पिकांना फटका बसू शकतो, असं जिल्हा कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी सांगितलं आहे.

सोयाबीन महागल्यानं शेतकऱ्यांचा कपाशीकड ओढा

कारंजा घाडगे तालुक्याच्या नारा येथील शेतकरी गोविंदा खवसी यांनी साडे तीन एकर शेतात कपाशी पिकाची लागवड केलीय.यंदा सोयाबीनच बियाणं महाग असल्याने त्यांनी कपाशीला पसंती दिली.सुरवातीला पावसाची दमदार हजेरी असल्याने शेतकरी आनंदीत होते. मात्र, आता पावसाच्या दडीने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.लवकर पावसाच्या सरी बरसल्या नाही तर आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच संकट ओढावणार आहे. सध्या हे शेतकरी आपलं पीक वाचविण्यासाठी धडपड करत आहेत, असं गोविंदा खवसी यांनी सांगितलं आहे.

सुरुवातीला समाधानकारक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलीय.मात्र, आता पावसाने दगा दिल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

संबंधित बातम्या:

Modi Cabinet Reshuffle : मोदी कॅबिनेट विस्ताराआधीच धक्क्यावर धक्के, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांपाठोपाठ आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धनचाही राजीनामा

Modi Cabinet Expansion: प्रीतम मुंडेंचं मंत्रीपद हुकलं, मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी पंकजांचं ट्विट, म्हणाल्या…

(Wardha Farmers facing problems due to lack of Monsoon rain in district)