Marathwada : पावसाळ्यातही मोसंबीच्या बागा ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव, कशामुळे ओढावली ही परस्थिती?

| Updated on: Jun 24, 2022 | 3:40 PM

मराठवाडा विभागात फळबागांचे क्षेत्र कमी असले तरी जालना आणि उर्वरित भागामध्ये मोसंबीवर शेतकऱ्यांनी भर दिलेला आहे. त्यामुळे विभागात 49 हजार हेक्टरावर मोसंबीचे उत्पादन घेतले जाते. शिवाय सरकारकडून मोसंबीला मराठवाड्यात मार्केट मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्नही केले जात आहेत. असे असताना मराठवाड्यातील बदलत्या वातावरणाचा थेट परिणाम उत्पादनावर आणि क्षेत्रावर देखील होऊ लागला आहे.

Marathwada : पावसाळ्यातही मोसंबीच्या बागा मर रोगाचा प्रादुर्भाव, कशामुळे ओढावली ही परस्थिती?
मोसंबी बाग
Follow us on

औरंगाबाद : भर (Rain Season) पावसाळ्यात शेत शिवार कसा हिरवा शालू पांघरलेला असे चित्र दरवर्षी असते पण यंदा परस्थिती ही वेगळीच आहे. पावसाच्या लहरीपणामुळे हिरवेगार तर सोडाच पण सध्याच्या (Cloudy Climate) ढगाळ वातावरणामुळे मोसंबी बागांमध्ये मर रोगाचे प्रमाण वाढत आहे. विशेषत: जालना जिल्ह्यात (Mosambi garden) मोसंबीचे क्षेत्र अधिक असून येथे बागेतील बहर आलेली अनेक झाडे ही वाळत आहेत. त्यामुळे खरीप हंगामाबरोबर आता मोसंबीच्या बागा वाचवण्याचेही आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. या रोगामुळे मोसंबीची झाडे ही बुडापासूनच वाळत आहेत. त्यामुळे अशा कठीण प्रसंगी कृषी विभागाचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन गरजेचे आहे.

49 हजार हेक्टरावर मोसंबीच्या बागा

मराठवाडा विभागात फळबागांचे क्षेत्र कमी असले तरी जालना आणि उर्वरित भागामध्ये मोसंबीवर शेतकऱ्यांनी भर दिलेला आहे. त्यामुळे विभागात 49 हजार हेक्टरावर मोसंबीचे उत्पादन घेतले जाते. शिवाय सरकारकडून मोसंबीला मराठवाड्यात मार्केट मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्नही केले जात आहेत. असे असताना मराठवाड्यातील बदलत्या वातावरणाचा थेट परिणाम उत्पादनावर आणि क्षेत्रावर देखील होऊ लागला आहे. गेल्या महिन्याभरातच मर रोगाचे प्रमाण हे वाढत आहे. त्यामुळे वेळीच बागायातदार शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळाले तर शेतकऱ्यांचा खर्च तर टळणार आहेच पण उत्पादनही वाढेल.

कशामुळे ओढावते ही परस्थिती?

ऐन पावसाळ्याच्या तोंडावरच मर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. एका बहराची भरपूर फळे झाडावर असतानाच पुन्हा मृगासाठी मोसंबी बागा ताणावर सोडल्याने झाडे सुकण्याचे प्रमाण वाढत असल्याचे मोसंब संशोधन संस्थेचे डॉ. संजय पाटील यांनी सांगितले आहे. अधिकच्या उत्पादनासाठी शेतकरी असे प्रयोग करतात. मात्र, यामुळे धोकाही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे बहराच्या दरम्यानच शेतकऱ्यांनी ती प्रक्रिया करावी असा सल्ला देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

खोडांची इजा नुकसानीकारकच, शेतकऱ्यांनी काय करावे?

मर रोगाचा प्रादुर्भाव किंवा झाडे सुकण्यास सुरवात झाली की शेतकऱ्यांनी प्रथम झाडावरील सर्व फळे ताबडतोब काढून त्यावर बुरशीनाशक फवारणे गरजेचे आहे. हा प्रकार जवळ-जवळ लागवड, रासायनिक खतांचा मारा, सुक्ष्म मुलद्रव्यांची कमतरता, प्रकाश संश्लेषण कमी मिळणे, खोडांना इजा होणे, ज्यादा पाणी देणे यामुळेच मर रोगाची लागण होते. शिवाय यामुळे उत्पादनातही घट होत असल्याचे कृषितज्ञांचे म्हणणे आहे.