हमालांच्या मानधानाचा प्रश्न चिघळला, वखार महामंडळासमोर 37 ट्रकमध्ये धान्य पडून, काय आहे नेमके प्रकरण?

| Updated on: Mar 15, 2022 | 10:47 AM

धान्याची उत्पादकता वाढली तरी त्याचे व्यवस्थापनही महत्वाचे आहे. मात्र, धान्य विक्रीनंतर त्याची साठवणूक आणि सुरक्षतेसाठी वखार महामंडळाची गोडावून उभारण्यात आलेली आहेत. मात्र, रत्नागिरीमध्ये अजबच प्रकार समोर आला आहे. येथील वखार महामंडळातील हमालांनी मानधन वाढीसाठी संप पुकारला असून धान्य उतरुन घेण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे गोडावूनला ट्रकच्या माध्यमातून धान्याची आवक तर सुरु आहे. मात्र, ते उतरुन घेतले जात नसल्याने या गोडावूनसमोर वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत.

हमालांच्या मानधानाचा प्रश्न चिघळला, वखार महामंडळासमोर 37 ट्रकमध्ये धान्य पडून, काय आहे नेमके प्रकरण?
वखार महामंडळ
Follow us on

रत्नागिरी : धान्याची उत्पादकता वाढली तरी त्याचे व्यवस्थापनही महत्वाचे आहे. मात्र, धान्य विक्रीनंतर त्याची साठवणूक आणि सुरक्षतेसाठी (Warehouse) वखार महामंडळाची गोडावून उभारण्यात आलेली आहेत. मात्र, (Ratnagiri) रत्नागिरीमध्ये अजबच प्रकार समोर आला आहे. येथील वखार महामंडळातील हमालांनी मानधन वाढीसाठी संप पुकारला असून धान्य उतरुन घेण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे गोडावूनला ट्रकच्या माध्यमातून (Grains Arrival) धान्याची आवक तर सुरु आहे. मात्र, ते उतरुन घेतले जात नसल्याने या गोडावूनसमोर वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत. त्यामुळे येथील ठेकेदार आणि महामंडळ हे हमालांची जबाबदारी घेत नाहीत. शिवाय हमालीसंदर्भात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जात नाही. आता प्रति टन 50 रुपये मानधन केल्याशिवाय धान्य उतरुन घेतले जाणार नसल्याची भूमिका येथील हमालांनी घेतली आहे.

कामाचे नियोजन, मानधनाचे काय?

सध्या हंगाम जोमात असून वखार महामंडळातील गोडावूनला धान्यसाठाची मोठ्या प्रमाणात आवक सुरु आहे. हेच टायमिंग साधत येथील हमालांनी संपाचे अस्त्र काढले आहे.गेल्या अनेक दिवसांपासून वाराई वाढवण्याचे आश्वासन वखार महामंडळ व ठेकेदाराकडून दिले जात होते. मात्र, प्रत्यक्षात अंमबलजावणी होत नसल्याने हमालांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. आता हंगाम सुरु होताच वाढीव मागधनाची मागणी हमालांनी वखार महामंडळ आणि संबंधित ठेकेदार यांच्याकडे केली आहे. शिवाय जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत माघार नाही ही भूमिका त्यांनी घेतली आहे.

वखार महामंडळासमोर वाहनांच्या रांगा

सध्या जिल्हाभर हमीभाव केंद्र सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे धान्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून खरेदी झालेला माल हा वखार महामंडळाच्या गोडावूनलाच दाखल केला जातो. मात्र, दोन दिवसांपासून हमाली हा माल उतरवून घेत नाहीत. त्यामुळे वखार महामंडळासमोर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मंगळवारी तर 37 वाहने उभी होती. वेळेत माल उतरुन घेतला नाही तर वजनात घट होण्याचा धोका आहे.

प्रति टनमागे 50 रुपये मानधनाची मागणी

गोडावूनमधल्या 1 टन धान्याच्या मागे 50 रुपये हे हमालांना देण्यात येण्याची मागणी हमालांची आहे. मात्र, याकडे ना वखार महामंडळाचे लक्ष आहे ना ठेकेदाराचे. त्यामुळे हा मोका साधून आंदोलनाची भूमिका घेण्यात आली आहे. यावर तोडगा काय निघतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

खरिपात नुकसान, रब्बी तरी पदरी पडू द्या, शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयातच ठिय्या

Washim : शेतकरीही कमर्शियल, उन्हाळी हंगामात पारंपरिक पिकांना केले दूर अन् कडधान्यावर भर

Latur Market : सोयाबीन-हरभऱ्याचे दर स्थिर, आवक मात्र तेजीत, आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे चित्र?