Chetan Patil

Chetan Patil

Senior Sub Editor - TV9 Marathi

chetans.patil@tv9.com

चेतन पाटील यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटिकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर चेतन पाटील यांनी ‘लोकमत’ वृत्तपत्रात इंटर्नशीप केली आहे. चेतन यांनी ‘लोकमत’मध्ये काम करत असताना आयुष्यात सर्वात पहिल्यांदा ‘लाडली’ पुरस्कार सोहळ्याचं वृत्तांकन केलं होतं. यानंतर त्यांनी विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित बातम्यांचं वृत्तांकन केलं. लोकमतची इंटर्नशीप पूर्ण झाल्यानंतर चेतन यांनी दक्षिण मुंबईतील ‘माय चॅनल’ या लोकल वाहिनीत काही दिवस काम केलं. यानंतर त्यांनी ‘न्यूज 24’ या वृत्तवाहिनीत इंटर्नशीप केली. यानंतर त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीत असायमेंट डेस्कवर काम केलं.

चेतन पाटील यांना मे 2018 मध्ये ‘आपलं महानगर’सोबत काम करण्याची संधी मिळाली. तिथे त्यांची ऑनलाईन पत्रकारितेच्या कारकीर्दीला सुरूवात झाली. ‘आपलं महानगर’च्या ‘माय महानगर’ वेबसाईटसाठी काम करत असताना चेतन पाटील यांनी आयपीएलच्या मोसमात यूट्यूबवर स्पेशल सीरिज केली. याशिवाय राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या केल्या. ‘माय महानगर’मध्ये दोन वर्ष काम केल्यानंतर त्यांना ‘टीव्ही 9 मराठी’ वृत्तवाहिनीच्या डिजीटल टीममध्ये काम करण्याची संधी चालून आली. चेतन पाटील यांनी दोन वर्ष ‘टीव्ही 9 मराठी’सोबत काम केल्यानंतर त्यांना ‘न्यूज 18 लोकमत’सोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी इथे जवळपास वर्षभर काम केलं. यानंतर त्यांना पुन्हा ‘टीव्ही 9 मराठी’सोबत काम करण्याची संधी मिळाली.

चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

चेतन पाटील यांची अहिराणी भाषेसाठी, खान्देशासाठी आणि अहिराणी कलाकारांसाठी काम करण्याची इच्छा आहे. ते संधी मिळेल तसा त्याबाबतच्या बातम्यांना न्याय देण्याचा प्रयत्नही करतात.

चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.

Read More
Follow On:
PM Modi on Uddhav Thackeray : मोदी उद्धव ठाकरे यांना उत्तराधिकारी मानणार का? वाचा काय दिलं उत्तर

PM Modi on Uddhav Thackeray : मोदी उद्धव ठाकरे यांना उत्तराधिकारी मानणार का? वाचा काय दिलं उत्तर

"दोन गोष्टी आहेत. बायोलॉजिकली ते त्यांचे चिरंजीव आहे. तो माझा विषयच नाही. ते आजारी होते. तेव्हा मी त्यांना फोन केला होता. मी वहिनीला रोज फोन करून विचारायचो. ऑपरेशन पूर्वी त्यांनी मला फोन केला होता", असं नरेंद्र मोदी म्हणाले.

PM Modi TV9 Interview : ‘उद्धव ठाकरे आजारी असताना रश्मी वहिनींना रोज फोन करायचो’, नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

PM Modi TV9 Interview : ‘उद्धव ठाकरे आजारी असताना रश्मी वहिनींना रोज फोन करायचो’, नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क TV9 ला एक्सक्लूझिव्ह मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांच्यासह TV9 ग्रुपच्या पाच व्यवस्थापकीय संपादकांनी ही मुलाखत घेतली आहे.

PM Modi on Uddhav Thackeray : ‘उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या संकट आलं तर मदतीला पहिले धावून जाईन’, नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य

PM Modi on Uddhav Thackeray : ‘उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या संकट आलं तर मदतीला पहिले धावून जाईन’, नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या मुलाखतीने महाराष्ट्राच्या राजकारणात दुरगामी परिणाम पडतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण देशात सध्या लोकसभा निवडणूक सुरु आहे. त्यानंतर लगेच सहा महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा वातावरणात नरेंद्र मोदींनी टीव्ही 9 च्या मुलाखतीत 'उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या संकट आलं तर मदतीला पहिले धावून जाईन' असं महत्त्वाचं आणि मोठं वक्तव्य केलं आहे.

PM Modi on Balasaheb Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलताना नरेंद्र मोदी भावूक,  म्हणाले, ‘ती मी बाळासाहेबांना वाहिलेली श्रद्धांजली’

PM Modi on Balasaheb Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलताना नरेंद्र मोदी भावूक, म्हणाले, ‘ती मी बाळासाहेबांना वाहिलेली श्रद्धांजली’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क TV9 ला एक्सक्लूझिव्ह मुलाखत दिलीय. ‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांच्यासह TV9 ग्रुपच्या पाच व्यवस्थापकीय संपादकांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत नरेंद्र मोदी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी बोलताना भावूक झाले.

Narendra Modi TV9 Interview : नरेंद्र मोदींची पहिली रोखठोक मुलाखत, पंतप्रधानांनी सांगितला 2014, 2019 आणि 2024 च्या निवडणुकीतला फरक

Narendra Modi TV9 Interview : नरेंद्र मोदींची पहिली रोखठोक मुलाखत, पंतप्रधानांनी सांगितला 2014, 2019 आणि 2024 च्या निवडणुकीतला फरक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी TV9 ला एक्सक्लूझिव्ह मुलाखत दिलीय. या मुलाखतीत त्यांनी देश आणि राज्यातील विविध राजकीय घडामोडींवर अतिशय रोखठोकपणे उत्तरे दिली आहे. मोदींनी काही प्रश्नांवर अतिशय मार्मिक तर काही प्रश्नांचं उत्तर देताना मोदी स्वत: भावनिक झाले आहेत.

PM Modi Exclusive Interview : थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक्सक्लूझिव्ह मुलाखत, पाहा इथे

PM Modi Exclusive Interview : थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक्सक्लूझिव्ह मुलाखत, पाहा इथे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क TV9 ला दिलेल्या विशेष मुलाखतीत लोकसभा निवडणुकीसोबतच इतर अनेक ज्वलंत मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. पाच संपादकांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला पंतप्रधान मोदींनी उत्तर दिले आहे. पीएम मोदींची ही मुलाखत रात्री ८ वाजता प्रसारित होणार आहे.

‘एकनाथ शिंदे यांचं उद्धव ठाकरेंसोबत मोठं डील, मुख्यमंत्र्यांनी मुलासाठी ठाणे सोडलं?’, भाजपच्या संतप्त पदाधिकाऱ्याचा आरोप

‘एकनाथ शिंदे यांचं उद्धव ठाकरेंसोबत मोठं डील, मुख्यमंत्र्यांनी मुलासाठी ठाणे सोडलं?’, भाजपच्या संतप्त पदाधिकाऱ्याचा आरोप

ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप पदाधिकारी संतापले आहेत. भाजपच्या 539 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. तसेच यापैकी एका पदाधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे.

महायुतीत मोठी बिघाडी, ठाण्याच्या जागेवरुन भाजप पदाधिकारी आक्रमक, 64 माजी नगरसेवकांचे राजीनामे

महायुतीत मोठी बिघाडी, ठाण्याच्या जागेवरुन भाजप पदाधिकारी आक्रमक, 64 माजी नगरसेवकांचे राजीनामे

अखेर महायुतीत ज्या गोष्टीची भीती होती तेच घडताना दिसत आहे. महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. महायुतीकडून ठाण्याच्या जागेसाठी शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पण याच गोष्टीला भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. विशेष म्हणजे नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या तब्बल 64 माजी नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत.

जेव्हा मिस युनिवर्स सुष्मिता सेन बेशुद्ध पडली होती, 30 वर्षांपूर्वी फोटोशूट करताना घडलेला प्रकार

जेव्हा मिस युनिवर्स सुष्मिता सेन बेशुद्ध पडली होती, 30 वर्षांपूर्वी फोटोशूट करताना घडलेला प्रकार

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन 1994 मध्ये मिस युनिवर्स बनली होती. त्यावेळी मिस युनिवर्स सुष्मिता सेनचा आयकॉनिक फोटोशूट करण्यात आलं होतं. हे फोटोशूट ताजमहलच्या समोर झालं होतं. डिजायनर रितू कुमार हिने याबाबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

स्पेशल रिपोर्ट : हेमंत गोडसेंना तिकीट पण महाराज खेळ बिघडवणार?

स्पेशल रिपोर्ट : हेमंत गोडसेंना तिकीट पण महाराज खेळ बिघडवणार?

नाशिकमध्ये अखेर शिंदेंच्या शिवसेनेकडून हेमंत गोडसेंना तिकीट जाहीर झालंय. पण आता शिंदे गटाकडून इच्छूक असलेल्या शांतीगिरी महाराजांनी दंड थोपटलेत. लढणार आणि जिंकणार म्हणत शांतीगिरी महाराजांनी आव्हान उभं केलंय.

मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....