AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi on Uddhav Thackeray : मोदी उद्धव ठाकरे यांना उत्तराधिकारी मानणार का? वाचा काय दिलं उत्तर

"दोन गोष्टी आहेत. बायोलॉजिकली ते त्यांचे चिरंजीव आहे. तो माझा विषयच नाही. ते आजारी होते. तेव्हा मी त्यांना फोन केला होता. मी वहिनीला रोज फोन करून विचारायचो. ऑपरेशन पूर्वी त्यांनी मला फोन केला होता", असं नरेंद्र मोदी म्हणाले.

PM Modi on Uddhav Thackeray : मोदी उद्धव ठाकरे यांना उत्तराधिकारी मानणार का? वाचा काय दिलं उत्तर
नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो
| Updated on: May 02, 2024 | 9:41 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी TV9 ला एक्सक्लूझिव्ह मुलाखत दिलीय. ‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांच्यासह TV9 ग्रुपच्या पाच व्यवस्थापकीय संपादकांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या नात्याबाबत भाष्य केलं. नरेंद्र मोदी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलताना भावूक झाले. या मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही खरी शिवसेना आहे, असं म्हटलं. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार आहेत, असं म्हटलं. “ज्या कालखंडात ज्यांनी सरकार चालवलं. सर्व कामे बाळासाहेबांच्या विचारधारेच्या विरोधात होते. औरंगजेबाचं कौतुक करणाऱ्यासोबत बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा बसतो याचा प्रचंड राग महाराष्ट्राच्या मनात आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले. पण उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांचे उत्तराधिकारी किंवा वारस मानणार का? या प्रश्नावर बोलताना नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

“दोन गोष्टी आहेत. बायोलॉजिकली ते त्यांचे चिरंजीव आहे. तो माझा विषयच नाही. ते आजारी होते. तेव्हा मी त्यांना फोन केला होता. मी वहिनीला रोज फोन करून विचारायचो. ऑपरेशन पूर्वी त्यांनी मला फोन केला होता. म्हणाले, भाईसाब काय सल्ला आहे. मी म्हटलं, तुम्ही ऑपरेशन करा. बाकी चिंता सोडा. आधी शरीराकडे लक्ष द्या. बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी त्यांचा मान सन्मान करणारच. ते माझं शत्रू नाही. उद्या संकट आलं तर त्यांना मदत करणारा मी पहिला व्यक्ती असेल. एक कुटुंब म्हणून. पण बाळासाहेबांचे विचार आहे. त्यासाठी मी जगेन”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

‘आयुष्यभर मी त्यांचा आदर करत राहीन’

“बाळासाहेबांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. मी ते कर्ज कधीच विसरु शकत नाही. कर्ज विसरु शकत नाही. आमच्याकडे सर्वाधिक आमदार आहे. तरीही शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. ती मी बाळासाहेबांना वाहिलेली श्रद्धांजली आहे. आम्ही मागच्या निवडणुकीत आमनेसामने लढलो होतो. मी त्या निवडणुकीत बाळासाहेबांबद्दल एक शब्दही बोललो नव्हतो. मी जाहीरपणे म्हणाालो होतो की, मला उद्धव ठाकरेंनी कितीही शिव्या दिल्या तरी मी बोलणार नाही. कारण माझी बाळासाहेबांवर श्रद्धा आहे. त्यामुळे त्यांच्या कौटुंबीक समस्या काय आहेत, तो माझा विषय नाही. पण मी बाळासाहेबांचा प्रचंड आदर करतो. आणि आयुष्यभर मी त्यांचा आदर करत राहीन” असंही मोदी म्हणाले.

‘सत्तेच्या हव्यासापायी बाळासाहेबांचं स्वप्न यांनी का मोडलं?’

“मलाही वाटतंय यावेळी ही इमोशनल परिस्थिती भाजपच्या बाजूने आहे. युतीच्या बाजूने आहे. कारण बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आमच्यासोबत आहे. अधिकृत राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे. त्यामुळे लोकांना वाटतंय की कुटुंबाच्या सत्तेच्या हव्यासापायी बाळासाहेबांचं स्वप्न यांनी का मोडलं? कुटुंबाच्या भल्यासाठी? आपल्या मुलाला इस्टॅब्लिश करण्यासाठी? बाळासाहेबांचा एवढा मोठा वारसा. बाळासाहेबांनी शिवसैनिकांसाठी जीवन अर्पण केलं होतं. त्यामुळे शिवसैनिकांच्या सन्मानासाठी जी शिवसेना काम करत आहे, जी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे, ती आज आमच्यासोबत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मतदार आमच्यासोबत भावनने जोडलेला गेला आहे”, असा दावा मोदींनी केला.

रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.