AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 PBKS vs RCB Live Streaming : पंजाब आणि बंगळुरु दोघांसाठी अखेरची संधी, कोण ठरणार यशस्वी?

Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru Live Streaming : पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु दोन्ही संघ आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे.

IPL 2024 PBKS vs RCB Live Streaming : पंजाब आणि बंगळुरु दोघांसाठी अखेरची संधी, कोण ठरणार यशस्वी?
pbks vs rcb,Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: May 08, 2024 | 5:09 PM
Share

आयपीएलच्या 17 व्या मोसमात पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 25 मार्चनंतर पुन्हा एकदा आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांसाठी आता होणार सामना हा अटीतटीचा आणि प्लेऑफच्या हिशोबाने निर्णायक असणार आहे. शिखर धवन याच्या अनुपस्थितीत सॅम करन पंजाबचं नेतृ्त्व सांभाळतोय. तर फाफ डु प्लेसीस याच्याकडे आरसीबीची धुरा आहे. पंजाब आणि आरसीबी दोघांची स्थिती सारखीच आहे.

पंजाब आणि आरसीबीने आतापर्यंत खेळलेल्या 11 पैकी 4 सामने जिंकले आहेत. आरसीबी आणि पंजाब दोन्ही संघ पॉइंट्स टेबलमध्ये अनुक्रमे सातव्या आणि आठव्या स्थानी आहेत. दोघांसाठी प्लेऑफमध्ये क्वालिफाय करण्यासाठी ही जरतरच्या समीकरणानुसार अखेरची संधी आहे. त्यामुळे पंजाबला पराभवाचा वचपा घेत आव्हान कायम राखण्याची दुहेरी संधी आहे. तर आरसीबी दुसऱ्यांदाही पंजाबला पाणी पाजणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

पंजाब विरुद्ध आरसीबी सामना केव्हा?

पंजाब विरुद्ध आरसीबी सामना गुरुवारी 9 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.

पंजाब विरुद्ध आरसीबी सामना कुठे?

पंजाब विरुद्ध आरसीबी सामना हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाला येथे खेळवण्यात येणार आहे.

पंजाब विरुद्ध आरसीबी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

पंजाब विरुद्ध आरसीबी सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

पंजाब विरुद्ध आरसीबी सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

पंजाब विरुद्ध आरसीबी सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

पंजाब विरुद्ध आरसीबी सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

पंजाब विरुद्ध आरसीबी सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.

पंजाब किंग्स टीम : शिखर धवन (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो, हरप्रीत सिंग भाटिया, प्रभसिमरन सिंग, रायली रोसो, जितेश शर्मा, सॅम कुरान, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, शिवम सिंग, सिकंदर रझा, अथर्व तायडे, ख्रिस वोक्स, अर्शदीप सिंग, राहुल चहर, नाथन एलिस, हरप्रीत ब्रार, विद्वथ कवेरप्पा, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, प्रिन्स चौधरी, आशुतोष शर्मा, विश्वनाथ सिंग आणि तनय त्यागराजन.

आरसीबी टीम : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), यश दयाल, विजयकुमार विशक, रीस टोपली, स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, हिमांशू शर्मा, राजन कुमार, मोहम्मद सिराज, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मयंक डागर, सुयश प्रभुदेसाई, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, विल जॅक्स, कॅमरन, कॅमरून , मनोज भंडागे, आकाश दीप, रजत पाटीदार, विराट कोहली, दिनेश कार्तिक, सौरव चौहान आणि अनुज रावत.

कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?.
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!.
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी.
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.