Pune Civic Polls: पुणे मनपा निवडणुकीसाठी धंगेकर यांना ठेवलं दूर, भाजपसोबतच्या बैठकीत बोलवलंच नाही!
पुणे महापालिका निवडणुकीच्या जागावाटपासाठी भाजपसोबत झालेल्या बैठकीत शिंदे सेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांना निमंत्रण दिले गेले नाही. भाजपच्या विरोधामुळे धंगेकरांना जाणूनबुजून बाजूला ठेवल्याची चर्चा आहे. धंगेकर यांनी यावर नाराजी व्यक्त करत युतीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेना आणि भाजप यांच्यातील जागावाटपाच्या बैठकीतून शिंदे सेनेचे स्थानिक नेते रवींद्र धंगेकर यांना वगळण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने धंगेकरांना बैठकीत बोलावण्यास विरोध दर्शवला होता. त्यामुळे शिंदे सेनेने आपल्याच स्थानिक नेत्याला निमंत्रण न देता भाजपसोबत ही बैठक उरकली. या बैठकीत भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. तर शिंदे सेनेकडून मंत्री उदय सामंत, विजय शिवतारे आणि विधानपरिषदेच्या नीलम गोऱ्हे यांनी हजेरी लावली होती. मूळ पुण्यातील धंगेकरांना मात्र या बैठकीपासून दूर ठेवण्यात आले. यामुळे शिंदे गटात अंतर्गत विसंवाद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. धंगेकर यांनी आपल्याला अद्याप निमंत्रण आले नसल्याचे म्हटले आहे.
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!

