Triumph ची ‘ही’ लोकप्रिय बाईक चर्चेत, EMI किती बसेल जाणून घ्या

तुम्ही नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. आज आम्ही तुम्हाला Triumph Speed T4 या बाईकविषयी माहिती सांगणार आहोत.

Triumph ची ‘ही’ लोकप्रिय बाईक चर्चेत, EMI किती बसेल जाणून घ्या
triumph
Image Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Sep 05, 2025 | 4:00 PM

तुम्ही बाईक खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सध्या Triumph Speed T4 ही बाईक चर्चेत आहे. तुम्ही Triumph Speed T4 ही बाईक खरेदी करण्यासाठी फक्त आणि फक्त 30,000 रुपयांचे डाऊनपेमेंट करून सुलभ EMI मध्ये घरी नेऊ शकतात. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

आजच्या काळात बाईक वाहतुकीचे सर्वात सोपे साधन बनले आहे. जिथं जायचं असेल तिथे फक्त चावी ठेवून जा. तसेच आजकाल बाईक मिळवणे खूप सोपे झाले आहे. तुम्ही बाईकफायनान्स करू शकता. डाऊन पेमेंट म्हणून थोडी फार रक्कम भरून आणि उरलेले पैसे कर्ज घेऊन तुम्ही घरी आणू शकता. यासाठी तुम्हाला दर महिन्याला ईएमआय भरावा लागेल.

आज आम्ही तुमच्यासाठी Triumph ची लोकप्रिय बाईक Triumph Speed T4 ची फायनान्स डिटेल्स घेऊन आलो आहोत. 2 लाख रुपयांची Triumph Speed T4 ही बाईक तुम्ही फक्त 30 हजार रुपये भरून मिळवू शकता. यासाठी तुम्हाला किती ईएमआय भरावा लागेल हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

किंमतीबद्दल बोलायचे झाले तर Triumph Speed T4 बाईकची नोएडामध्ये सुरुवातीची किंमत 1,99,000 रुपये आहे. त्यानंतर रोड टॅक्स (आरटीओ) म्हणून 19 हजार 900 रुपये आणि विम्यापोटी 20 हजार 738 रुपये मोजावे लागणार आहेत. या खर्चामुळे बाईकची किंमत वाढणार असून बाइकची ऑन रोड किंमत 2,39,638 रुपये असेल. आता तुम्हाला बाईकची किंमत माहित आहे, आम्ही तुम्हाला फायनान्स डिटेल्सबद्दल सांगतो.

बाईक फायनान्स डिटेल्स

30 हजार रुपये डाउन पेमेंट भरून ही बाईक खरेदी केल्यास उर्वरित 2 लाख 9 हजार 638 रुपये बँकेकडून कर्ज घ्यावे लागतील. जर तुमच्याकडे बँकेकडून पाच वर्षांसाठी कर्ज असेल आणि व्याजदर 10 टक्के असेल तर तुम्ही दर महा ईएमआयची गणना करू शकता. त्यानुसार तुम्हाला दरमहा 4,454 रुपये हप्ता म्हणून भरावा लागेल, हा हप्ता पुढील पाच वर्ष चालेल. त्यानुसार तुम्हाला 57,613 रुपये व्याज द्यावे लागेल आणि यामुळे बाईकची एकूण किंमत 2,67,251 रुपये होईल.

Triumph Speed T4 चे फीचर्स

बाईकमध्ये 398.15 सीसीलिक्विड कूल्ड, 4-व्हॉल्व्ह, डीओएचसी, सिंगल सिलिंडर इंजिन आहे जे 31 पीएस पॉवर आणि 36 एनएम टॉर्क जनरेट करते. यात 6 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला असून ही बाईक सेल्फ स्टार्ट करता येते. या बाईकमध्ये अॅनालॉग आणि डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, यूएसबी चार्जिंग पोर्ट, एलईडी हेडलाईट, एलईडी टेललाईट, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प, फ्यूल इंडिकेटर सह अनेक उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत. बाईकचे कर्व्ह वेट 180 किलो ग्रॅम आहे. 13 लीटर इंधन क्षमता असलेली ही बाईक 30 किलोमीटरचे मायलेज देण्याचा दावा करते.