बजाज लाँच करणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर , किती असेल किंमत, काय असतील फीचर्स?

बजाज लवकरच सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे. नवीन मॉडेल जून २०२५ च्या शेवटी लाँच होणार असून ते विक्रीसाठी उपलब्ध असेल. याबाबत महत्वाची माहिती जाणून घेऊयात.

बजाज लाँच करणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर , किती असेल किंमत, काय असतील फीचर्स?
| Updated on: Jun 05, 2025 | 6:55 PM

इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार असलेल्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय दुचाकी कंपनी बजाज लवकरच सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे. बजाजने एप्रिल २०२५ मध्ये इलेक्ट्रिक स्कूटर चेतक ३५ सीरीजमधील सर्वात स्वस्त मॉडेल ३५०३ लाँच केले होते. याची एक्स-शोरूम किंमत १.१० लाख रुपये इतकी होती, मात्र आता बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचे सर्वात स्वस्त मॉडेल लाँच करणार आहे. याची किंमत किती असेल ते जाणून घेऊयात.

बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल जून २०२५ च्या शेवटी लाँच होणार असून ते विक्रीसाठी उपलब्ध असेल. नवीन ई-स्कूटर चेतक २९०३ सारखी असणार आहे. मात्र यात थोडे बदल असणार आहेत. ई-स्कूटर चेतक २९०३ ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे.

किंमत १ लाखांपेक्षा कमी असणार

सध्या चेतक २९०३ ची किंमत ९९,९९८ रुपये (एक्स-शोरूम) आहे. मात्र नव्या मॉडेलची किंमत यापेक्षा कमी असणार आहे. तसेच २९०३ च्या तुलनेत या नवीन स्कूटरमध्ये अनेक अपग्रेडड फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. मात्र या मॉडेलची किंमत १ लाखापेक्षा कमी असणार आहे. त्यामुळे या स्कूटरवर सर्वांच्या नजरा असणार आहेत. या स्कूटरसह बजाजचा ईव्ही पोर्टफोलिओ आणखी मजबूत होणार आहे. .

या स्कूटरमध्ये मिळणार खास फीचर्स

मिळालेल्या माहितीमुसार बजाज कंपनी या मॉडेलमध्ये रेंज वाढवण्याची शक्यता आहे. तसेच या स्कूटरच्या चेसिसमध्ये काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. यात सीटखाली चांगले स्टोरेज आणि फ्लोअर ब्रॉड-माउंटेड बॅटरी पॅक दिला जाण्याची शक्यता आहे.

चेतक हे सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल

भारतात सध्या इलेक्ट्रिक बाइक्सची मागणी वाढत आहे. त्यामुळे बजाज कंपनीला आर्थिक वर्ष २०२६ मध्ये इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात २०-२५% वाढ अपेक्षा आहे. बजाजच्या एकूण देशांतर्गत उत्पन्नापैकी २५% आता इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीतून येते. तसेच कंपनीची चेतक ई-स्कूटर सीरीज आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीत इलेक्ट्रिक दुचाकी विभागातील सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल आहे. त्यामुळेच आता याचे स्वस्त मॉडेल लाँच केले जाणार आहे.