आता पेट्रोल भरण्यासाठी नव्हे तर ‘या’ कारणासाठी पेट्रोलपंपावर जावे लागणार

| Updated on: Jun 02, 2022 | 12:31 PM

बेंगलुरु बेस्ड इलेक्ट्रिक व्हीकल निर्माता आणि सर्व्हिस प्रोव्हाइडर स्टार्टअप कंपनी बाउंस इनफिनीटीने (Bounce Infinity) ने बॅटरी स्वॅपिंगसाठी भारत पेट्रोलिअमसोबत टाय-अप केले आहे. भारत पेट्रोलियमच्या क्षमतेचा वापर करुन ईव्ही स्टार्टअप पेट्रोलपंपांवर आधारीत बॅटरी स्वॅपिंग सर्व्हिसला देशभरात पोहचवणार आहे.

आता पेट्रोल भरण्यासाठी नव्हे तर ‘या’ कारणासाठी पेट्रोलपंपावर जावे लागणार
Image Credit source: tv9
Follow us on

लोक पेट्रोलपंपांवर आपआपल्या वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी जातात हे आपण सर्वांनाच माहिती आहे. परंतु आता बदलत्या क़ाळात पेट्रोलपंपावर केवळ इंधन भरायलाच जावे लागणार नसून आणखी एका गोष्टीसाठी तुम्हाला त्या ठिकाणी जावे लागणार आहे. बेंगलुरु बेस्ड इलेक्ट्रिक व्हीकल निर्माता आणि सर्व्हिस प्रोव्हाइडर स्टार्टअप कंपनी बाउंस इनफिनीटीने (Bounce Infinity) ने बॅटरी स्वॅपिंगसाठी भारत पेट्रोलिअमसोबत (Bharat Petroleum) टाय-अप केले आहे. भारत पेट्रोलियमच्या क्षमतेचा वापर करुन ईव्ही (Electric vehicle) स्टार्टअप पेट्रोलपंपांवर आधारीत बॅटरी स्वॅपिंग सर्व्हिसला देशभरात पोहचवणार आहे. दरम्यान ही सर्व्हिंस आतापुरता केवळ बेंगलुरुमध्ये सुरु करण्यात येईल.

पेट्रोल पंपावर होणार बॅटरी स्वॅप

बाउंस इनफिनिटी कंपनी आणि भारत पेट्रोल पंप यांच्या झालेल्या पार्टनरशिपमुळे स्टार्टअप कंपनीला एक मोठा खेळाडू मिळणार आहे. या नवीन खेळाडूमुळे कंपनीला बॅटरी स्वॅपिंग सर्व्हिंस देशभरात पोहचवण्यासाठी बळ मिळणार आहे. तर दुसरीकडे भारत पेट्रोलियमचा हा निर्णय क्लीन एनर्जीला प्रोत्साहन देणारा ठरणार आहे. या निर्णयाची सुरुवात सध्या केवळ बेंगलुरुपासून होणार आहे. त्यानंतर हळूहळू याचा देशभरात विस्तार होण्याची अपेक्षा आहे.

हे सुद्धा वाचा

दहा शहरांमध्ये तीन हजार स्वॅपिंग स्टेशन

करारानुसार, बाउंस इनफिनिटी भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपांवर आपली बॅटरी स्वॅपिंग स्टेशनची निर्मिती करेल. कंपनीचा देशभरात 10 शहरामध्ये तीन हजार बॅटरी स्वॅपिंग स्टेशनची निर्मिती करण्याचा प्लॅन आहे. बाउंस इनफिनिटीसोबत जोडले गेलेल्या नावांमध्ये भारत पेट्रोलियम हे सर्वात मोठे नाव असून या आधी कंपनीने बॅटरी स्वॅपिंग स्टेशनसाठी Greaves Eletric आणि BattRE सोबत पार्टनरशिप करण्याची घोषणा केली होती.

क्लीन एनर्जीबाबत सकारात्मक पाउल

बाउंस इनफिनिटीच्या म्हणण्यानुसार, क्लीन आणि प्रदुषणमुक्त देश बनविण्यासाठी हा निर्णय सकारात्मक ठरणार आहे. तर दुसरीकडे भारत पेट्रोलियमच्या म्हणण्यानुसार बीपीसीएल नेहमी सर्व प्रकारच्या एनर्जी सोल्यूशंस देण्यासाठी पुढे राहिली आहे. आणि आता बाउंस इनफिनिटीसोबत आम्ही क्लीन एनर्जीकडे एक पाउल पुढे टाकले आहे.

लाखों युजर्सना मिळणार लाभ

बाउंस इनफिनिटीच्या दाव्यानुसार, त्यांच्या 11 महिने जुना बॅटरी स्वॅपिंग नेटवर्कने आतापर्यंत 12 लाखांहून अधिक बॅटरी स्वॅपिंग केल्या आहेत. म्हणजेच, या बॅटरी स्वॅपच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांनी 4.9 कोटी किलोमीटरचा रस्ता पार केला आहे. नवीन पार्टनरशिपसोबत बाउंस इनफिनिटीला आपल्या लाखो युजर्सपर्यंत बॅटरी स्वॅपिंग सर्व्हिंस पोहचविण्याचे टार्गेट पूर्ण करायला मदत मिळणार आहे.