Car Insurance | केली ना गडबड? कशाला टाकला विम्याचा दावा, आता नुकसान सोसा

| Updated on: Jan 18, 2024 | 3:52 PM

Car Insurance | नवी कोरी कार खरेदी केल्यानंतर तुम्ही काही दिवस तर तिला एखाद्या फुलासारखं जपता. तिची साफसफाई, स्वच्छतेवर लक्ष देता. पण ही एक चूक झाली की तुम्हाला काय करु आणि काय नाही, असे होते. अस्वस्थ होत तुम्ही अजून एक गडबड करतात. त्यात तुमचे दुहेरी नुकसान होते.

Car Insurance | केली ना गडबड? कशाला टाकला विम्याचा दावा, आता नुकसान सोसा
Follow us on

नवी दिल्ली | 18 जानेवारी 2024 : नवी कोरी कार तुम्ही अगदी फुलासारखी ठेवता. नव्या नवरीचे नऊ दिवस असा हा प्रकार असतो. काही जण तर कार विषयी फारच हळवे असतात. कार रस्त्यावर उतरली तर किती ही काळजी घ्या काही ना काही गडबड होतेच. कारला डॅश लागतो, कारवर ओरखडे ओढल्या जातात. हा प्रत्येकाचा अनुभव आहे. त्याला कोणी टाळू शकत नाही. पण एक गोष्ट तुमच्या हातात असते, ती टाळली तर तुम्ही फायद्यात राहता. अनेक जण नुकसान भरपाईसाठी ते विमा कंपनीकडे क्लेम दाखल करतात. इथंच चूक होते. चुकीच्या वेळी नुकसान भरपाई मागितल्याने असे नुकसान होते.

खरंच, होईल नुकसान

तुम्ही म्हणाल काय राव, काही पण सांगताय. पण खरंच तुम्ही छोट्या छोट्या स्क्रॅचसाठी नुकसान भरपाई मागत असाल तर ही कृती चूक ठरते. या किरकोळ ओरखड्यासाठी काही जण विमा कंपनीकडे धाव घेतात आणि पायावर धोंडा पाडून घेतात. कारण विम्याचा दावा केल्याने पुढे नुकसान होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

झिरो डेप्रिसिएशन कव्हरचा चुकीचा अर्थ

वाहनचालक अनेकदा झिरो डेप्रिसिएशन कव्हरचा चुकीचा अर्थ काढतात. विमा पॉलिसी आहे म्हटल्यावर, कारला काहीही झाले तरी नुकसान भरपाई मिळेल, असा त्यांचा दावा असतो. पण टर्म अँड कंडिशन वाचल्यावर सगळी गडबड लक्षात येते. समजा तुम्ही कारवर स्क्रॅच आले, डेंट झाले तर झिरो डेप्रिसिएशन पॉलिसीत तुम्ही ते ठीक कराल. त्यासाठी साधारणतः 1100 ते 2000 रुपयांदरम्यान खर्च येऊ शकतो. बाहेर हेच काम तुम्ही अगदी स्वस्तात करु शकता.

सातत्याने क्लेम करणे नुकसानकारक

झिरो डेप्रिसिएशन पॉलिसीत वारंवार छोट्या-मोठ्या गोष्टीसाठी विमा दावा करणे हितकारक नसते. सातत्याने विमा दावा करुन नुकसान भरपाई मागितल्यास विमा कंपन्या अशा ग्राहकांना नंतर लक्षात ठेवतात. अशा ग्राहकावरच त्याचे खापर फुटते. क्लेम मंजूर करण्यासाठी मग कंपन्या बारकाईन दाव्याची तपासणी करतात. काही वेळा तर चूक दाखवून क्लेम सुद्धा मंजूर करत नाही.

NCB वर कार इन्शुरन्स दाव्याचा प्रभाव

एनसीबी हा एक फायदा, वाहनधारकांना मिळतो. जर तुम्ही वर्षभरात विमा दावा केला नाही तर त्याचा फायदा पुढील वर्षात पॉलिसीचे नुतनीकरण करताना होतो. तुम्हाला पुढील वर्षात कारची विमा पॉलिसी अजून स्वस्तात मिळते. दावा दाखल न केल्याने विमा प्रीमियमवर सवलत दिली जाते. तुम्ही विम्याचा दावा दाखल न केल्यास एनसीबीची रक्कम दरवर्षी वाढत जाते. त्यामुळे काही वर्षात तुम्हाला चांगली सूट मिळते.