AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EV Scooter: पेट्रोलच्या किंमतींनी हैराण…पंपाकडे ढुंकूनही पाहू नका… या टॉप इलेक्ट्रिक स्कूटर वापरा

Cheapest Electric Scooters: देशात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींनी सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. या किंमती अजून भडकण्याची भीती व्यक्त होत आहे. अशावेळी लोक आता दुसरा पर्याय शोधत आहेत. या इलेक्ट्रिक स्कुटर असल्यावर तुम्हाला पंपाकडे ढुंकूनही पाहण्याची गरज नाही.

EV Scooter: पेट्रोलच्या किंमतींनी हैराण...पंपाकडे ढुंकूनही पाहू नका... या टॉप इलेक्ट्रिक स्कूटर वापरा
स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक स्कुटरImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 19, 2026 | 2:28 PM
Share

Cheapest Electric Scooters in India: मध्य आशियातील इंधन संकटामुळे जग वेठीस आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जवळपास चार रुपये प्रति लिटरने वाढल्या आहेत. पाच दिवसांपूर्वी तीन रुपयांनी तर आज जवळपास एक रुपयांनी किंमती वधारल्या. लोक आता दुसरा पर्याय शोधत आहेत. या इलेक्ट्रिक स्कुटर असल्यावर तुम्हाला पेट्रोल पंपाकडे ढुंकूनही पाहण्याची गरज नाही.

Hero Vida V1 Plus/V2

हिरो मोटोकॉर्पने Vida ब्रँडसोबत इलेक्ट्रिक स्कुटर लाँच केली आहे. या स्कुटरच्या Baas मॉडेलची किंमत 44 हजारांपासून सुरु होते. तर इतर मॉडेल एक लाखांपासून सुरू होतात. या स्कुटरची रेंज 110 किमी इतकी आहे. Hero Vida V1 plus V2 मध्ये 7 इंच टचस्क्रीन, क्रूझ कंट्रोल आणि की-लेन्स एंट्री असे फिचर्स आहेत.

Bajaj Chetak ईव्ही

बाजारातील जुना प्लेअर बजाज कंपनीने बजाज चेतक ही स्कुटर बाजारात उतरवली आहे. Bajaj Chetak 2901 हे मॉडल आहे. या स्कुटरची किंमत 96 हजारांपासून सुरू होते. स्कुटरची बॅटरी 2.88 kWh आहे. तर दाव्यानुसार ही स्कुटर 123 किमीची रेंज देते. या स्कुटरमध्ये कलर डिजिटल कन्सोल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि हिल होल्ड असे फीचर्स आहेत.

Ather Rizta ची ईव्ही

Ather हा भारतीय बाजारातील नवीन भिडू आहे. कंपनीने Ather Rizta लाँच केली आहे. या कंपनीने इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये धाक जमवला आहे. ही स्कुटर 1.9 लाखांपासून सुरू होते. Ather Rizta स्कुटरमध्ये 2.9 kWh ची बॅटरी आहे. ही स्कुटर 123 किमीची रेंज देते. आरामदायी आसन, 34 लिटरचे सीट स्टोरेज, गुगल मॅप्स नॅव्हिगेशन सारखे स्मार्ट फिचर्स या स्कुटरमध्ये आहे.

Ola S1 X इलेक्ट्रिक स्कुटर

ओलाने भारतात इलेक्ट्रिक स्कुटर बाजारात दबदबा तयार केला आहे. कंपनीने Ola S1 मालिकेतील तिसरी पिढी समोर आणली आहे. Ola S1 X या इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत 74,999 रुपयांपासून होते. ही स्कुटर 2 kWh, 3 kWh आणि 4 kWh अशा तीन बॅटरी पर्यायात उपलब्ध आहे. या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये 4.3 इंचाची एलसीडी स्क्रीन देण्यात आलेली आहे.

TVS iQube ची इलेक्ट्रिक स्कुटर

TVS iQube च्या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये 2.2 kWh बॅटरी देण्यात आली आहे. या स्कुटरची रेंज 75 किमी इतकी आहे. या ईव्हीमध्ये 5 इंचची टीएफटी स्क्रीन, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि 32 लिटर स्टोरेज दिले आहे. TVS iQube च्या बेस मॉडेलची किंमत 95,000 रुपयांपासून सुरू होते. तर नवीन TVS iQube S आणि TVS iQube ST ची किंमत एक लाखांच्या पुढे आहे.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?