Mahindra XUV 3XO ते Maruti Suzuki Victoris पर्यंत, या 4 CNG कारमध्ये मोठी स्पेस
CNG Cars: आज आपण अशा चार कारच्या बाबतीत माहिती घेऊयात ज्यांच्या जास्त मोठी डिक्की आणि फूल बुट स्पेस मिळतो. या यादीत महिंद्रा, टाटा मोटर्स आणि मारुती सुझुकीच्या सीएनजी कारचा समावेश आहे.

फ्युएल एफिशिएन्सी आणि कमी रनिंग कॉस्ट सीएनजी कारसाठी एक चांगला पर्याय बनवते. मात्र, या कारमध्ये नेहमी एक अडचण असते ती म्हणजे बूट स्पेस. मात्र, आता कंपन्यांनी ग्राहकांची ही अडचण दूर केली आहे. आज आपण त्या सीएनजी कारची माहिती घेणार आहोत. ज्यात मोठ्या आकाराची डिक्की मिळत आहे.
Mahindra XUV 3XO ZNG
महिंद्राच्या Mahindra XUV 3XO ZNG या सीएनजी कारमध्ये २७० लिटरचा बूट स्पेस मिळते. यात फॅक्ट्री फिटेड ट्विन-सिलिंडर सीएनजी सेटअपचा वापर झाला आहे. ज्यामुळे फूल बुट स्पेस मिळतो.पेट्रोल व्हेरिएंटमध्ये ३६४ लिटर बूट कॅपेसिटीचा दावा केला आहे.या सीएनजी एसयुव्हीत १.२ लीटर थ्री सिलिंडर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे. जे सीएनजी मोडमध्ये 111hp पॉवर आणि 200Nm टॉर्क जेनरेट करते. सीएनजीवर ही कार एक किलोग्रॅममध्ये २४.७ किमीचे अंतर पार करते. ही ६ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये येते.या कारची किंमत ९.९९ लाख ( एक्स शोरुम ) ते १२.२७ लाख ( एक्स शोरुम ) पर्यंत आहे.
Maruti Suzuki Brezza S-CNG
एनडीटीव्ही ऑटोच्या मते मारुती सुझुकीच्या या सीएनजी कारमध्ये ३२८ लीटरचा बूट स्पेस मिळतो. या कारची सीएनजी टँक कार बॉडीच्या खाली आहे. या कारमध्ये १.५ लिटर नॅच्युअरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असून ते सीएनजी मोडमध्ये ८८ hp पॉवर आणि १२१.५ Nm टॉर्क जनरेट करते. ही कार एक किलोग्रॅमध्ये २६.९ किलोमीटरचे अंतर पार करु शकते.
Tata Nexon iCNG
Tata Nexon iCNG च्या सीएनजी मॉडेलमध्येही सिलिंडरसह तुम्हाला फुल बुट स्पेस मिळते. ३२१ लिटरच्या बूट स्पेस सह यात ट्वीन सिलिंडर सीएनजी टेक्नॉलॉजीच्या वापर झाला आहे. XUV 3XO ZNG च्या तुलनेत नेक्सन सीएनजीचा बूट स्पेस ५१ लिटर जास्त आहे.
या एसयुव्हीत १.२ लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे जे सीएनजी मोडमध्ये 100hp पॉवर आणि 170Nm टॉर्क जेनरेट करते. हे ६ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससोबत येते. एक किलोग्रॅममध्ये टाटाची ही कार २४ किलोमीटरचे अंतर कापते. या गाडीची किंमत ८.३५ लाख ( एक्स शोरुम ) ते १३.४२ लाख ( एक्स शोरुम ) आहे.
Maruti Suzuki Victoris S-CNG
मारुती सुझुकीच्या या एसयुव्हीत तुम्हाला सिलिंडरसह फुल बूट स्पेस मिळते ,या कारमध्ये ३२० लिटरची बूट स्पेस आहे. तसेच या कारच्या पेट्रोल व्हर्जनमध्ये ४३९ लिटरचा बूट स्पेस मिळतो. यात १.५ लिटरचे इंजिन असून ते 87hp पॉवर आणि 121.5Nm टॉर्क जेनरेट करते. एक किलोग्रॅममध्ये ही एसयुव्ही २७.०२ किलोमीटरचे अंतर कापते. या कारच्या सीएनजीच्या मॉडेलची किंमत ११.५५ लाख ( एक्स शोरुम ) ते १४.८२ लाख ( एक्स शोरुम ) पर्यंत आहे.