
Hero Electric Four Wheeler : दुचाकी वाहन निर्मिती करणारी कमंपनी Hero MotoCorp लवकरच चारी चाकी वाहनांमध्ये क्रांती आणणार आहे. इलेक्ट्रिक मोबिलिटी यूनिट VIDA अंतर्गत ‘Novus’ ही मायक्रो इलेक्ट्रिक चारचाकी NEX 3 सादर करणार आहे. यापूर्वी कंपनीने NEX 1 (एक पोर्टेबल वियरेबल माइक्रो मोबिलिटी डिव्हाईस) आणि NEX 2 (एक इलेक्ट्रिक ट्राईक) बाजारात आणले आहे. Hero MotoCorp ने इलेक्ट्रिक ब्रँड VIDA अंतर्गत नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल आणि स्कूटर सादर केल्या. कंपनीने VIDA VX2 Urban Scooter युरोपियन मार्केटमध्ये उतरवण्याची घोषणा केली आहे.
EICMA 2025मध्ये Hero ची झलक
Hero MotoCorp ने तंत्रज्ञानाची क्षमता EICMA 2025 (Global Two-Wheeler Exhibition) मध्ये दाखवली. कंपनीने आता चार चाकीत एक प्रयोग केला आहे. मायक्रो इलेक्ट्रिक वाहन NEX 3 सह दोन कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक मोटारसायकलVIDA Concept UBEX आणि VIDA Project VXZ सादर केली. हे नवीन इलेक्ट्रिक उत्पादनं स्मार्ट आणि टिकाऊ असतील. ते भविष्यातील दळणवळणाला चालना देतील.
NEX 3 एकदम सुपर कॉम्पॅक्ट कार
NEX 3 एक असे कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक वाहन आहे, जे कोणत्याही ऋतूत, हंगामात कोणत्याही अरूंद रस्त्यावरून चालवता येईल. शहरीच नाहीतर ग्रामीण भागासाठी ही कॉम्पॅक्ट कार महत्वपूर्ण असेल. या वाहनाला चार चाकं असतील. वाहन आणि प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेत आरामदायी प्रवासासाठी हे वाहन तयार करण्यात आले आहे. या वाहनाची किंमत चार लाखांच्या घरात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या वाहनात दोन आसन व्यवस्था आहे. एकमागे एक अशा पद्धतीने ही आसान व्यवस्था असेल. या कारचे डिझाईन हे केवळ फ्युचरिस्टिकच नाहीतर पर्यावरण पूरक असेल. कंपनीनुसार, हे वाहन वैयक्तिक उपयोग आणि शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल. तर कमी जागा लागत असल्याने दुचाकीपेक्षा या वाहनाला लोक पसंती देतील असा कंपनीचा व्होरा आहे. नवीन वाहनातून कोणत्याही ऋतूत प्रवास करणे सोपं होईल. त्यामुळे या वाहनाला बाजारात मागणी वाढू शकते. कारपेक्षा कमी जागा लागत असल्याने दोन व्यक्तींसाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो.
Hero MotoCorp ने इलेक्ट्रिक ब्रँड VIDA अंतर्गत नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल आणि स्कूटर सादर केल्या. कंपनीने VIDA VX2 Urban Scooter युरोपियन मार्केटमध्ये उतरवण्याची घोषणा केली आहे. यासह VIDA Concept UBEX आणि VIDA Project VXZ पण लवकरच बाजारात येईल, हे उत्पादन हिरोने Zero Motorcycles सोबत मिळून तयार केले आहे.