AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20i World Cup 2026 : टीम इंडियासमोर सेमी फायनलमध्ये कुणाचं आव्हान? वानखेडेत कुणाविरुद्ध भिडणार?

Team India T20i World Cup 2026 Semi Final Opponent : गतविजेता आणि यजमान असलेल्या टीम इंडियाने यंदाही यशस्वीरित्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. आता टीम इंडियाचा उपांत्य फेरीतील सामना कुणाविरुद्ध होणार? जाणून घ्या.

T20i World Cup 2026 : टीम इंडियासमोर सेमी फायनलमध्ये कुणाचं आव्हान? वानखेडेत कुणाविरुद्ध भिडणार?
Wankhede Stadium MumbaiImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Mar 02, 2026 | 6:26 AM
Share

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा 20 संघ सहभागी झाले. या 20 संघांना 5-5 नुसार 4 गटात विभागण्यात आलं. साखळी फेरीत प्रत्येक संघाने गटातील इतर संघांविरुद्ध प्रत्येकी 1 असे एकूण 4 सामने खेळले. त्यानंतर प्रत्येक गटातून 2 अव्वल संघ सुपर 8 साठी पात्र ठरले. तर इतर 12 संघांचं आव्हान संपुष्टात आलं. त्यानंतर सुपर 8 फेरीचा थरार रंगला. रविवारी 1 मार्च रोजी टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर करो या मरो अशा सामन्यात विजय मिळवला. यासह सेमी फायनलचं चित्र स्पष्ट झालं. टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहचली.

टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहचताच उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट झालं झालं आहे. टीम इंडियाआधी, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड सेमी फायनलसाठी पात्र ठरलेत. न्यूझीलंडचा अपवाद वगळता इतर 3 संघांची सेमी फायनलमध्ये पोहचण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली आहे. आता फायनलमध्ये पोहचणारे 2 संघ कोण असणार? हे सेमी फायनलच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. या निमित्ताने सेमी फायनलबाबत जाणून घेऊयात.

टीम इंडियासमोर कुणाचं आव्हान?

सेमी फायनलमधील दुसऱ्या सामन्यात गतविजेत्या आणि यजमान टीम इंडियासमोर इंग्लंडचं आव्हान असणार आहे. हा सामना 5 मार्चला मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडियाचा हा या 10 पर्वातील दुसरा सामना असणार आहे. टीम इंडियाने याआधी साखळी फेरीत वानखेडे स्टेडिममध्ये यूएसएला पराभूत केलं होतं.

इंडिया-इंग्लंड सलग तिसऱ्यांदा सेमी फायनलमध्ये

टीम इंडियासमोर सेमी फायनलमध्ये इंग्लंडचं आव्हान असणार आहे. भारत आणि इंग्लंडची सेमी फायनलमध्ये आमनेसामने येण्याची ही सलग तिसरी वेळ असणार आहे. याआधी दोन्ही संघ 2024 आणि 2022 साली सेमी फायनलमध्ये भिडले होते. इंग्लंडने भारताचा 2022 मध्ये 10 विकेट्सने धुव्वा उडवला होता. तर टीम इंडियाने 2024 मध्ये इंग्लंडला लोळवून 2022 च्या पराभवाची परतफेड केली होती. त्यामुळे दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत आहेत. अशात आता यंदा दोघांपैकी कोणता संघ ही आकडेवारी 2-1 अशी करुन सेमी फायनलचं तिकीट मिळवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दक्षिण आफ्रिका-न्यूझीलंड आमनेसामने

दरम्यान या स्पर्धेत उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात फायनलसाठी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. हा सामना 4 मार्चला कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये होणार आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार