Honda ची Activa 125 Premium स्कूटर भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

| Updated on: Dec 08, 2021 | 3:59 PM

Honda ने मंगळवारी भारतीय बाजारात नवीन Activa Premium Edition स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरच्या ड्रम अलॉय व्हेरिएंटसाठी 78,725 रुपये आणि डिस्क व्हेरिएंटसाठी 82,280 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) मोजावे लागतील.

1 / 5
Honda ने मंगळवारी भारतीय बाजारात नवीन Activa Premium Edition स्कूटर लाँच केली आहे. नवीन स्कूटर दोन ड्युअल टोन कलर पर्यायांमध्ये ऑफर केली आहे, ज्यामध्ये मॅट मॅग्निफिसेंट कॉपर मेटॅलिकसह पर्ल अमेझिंग व्हाइट आणि मॅट अर्ल सिल्व्हर मेटॅलिकसह मॅट स्टील ब्लॅक मेटॅलिक यांचा समावेश आहे. या स्कूटरच्या ड्रम अलॉय व्हेरिएंटसाठी 78,725 रुपये आणि डिस्क व्हेरिएंटसाठी 82,280 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) मोजावे लागतील.

2 / 5
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सेल्स अँड मार्केटिंग विभागाचे संचालक यादविंदर सिंह गुलेरिया म्हणाले की, “लाखो भारतीयांचा सच्चा साथीदार म्हणून Activa ने देशभरातील दुचाकी ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण केल्या आहेत. Activa 125 Premium व्हेरियंट लाँच करून आम्ही खास डिझाईन्स आणि कलर स्कीम्ससह इंटरेस्टिंग आणि प्रीमियम स्टाइल आणत आहोत."

3 / 5
Activa 125 Premium वरील कॉस्मेटिक अपडेट्स स्टँडर्ड Activa 125 स्कूटर प्रमाणेच आहेत. यामधील स्टायलिंग अपडेट्सबद्दल बोलायचे झाल्यास, स्कूटरला ड्युअल-टोन बॉडी कलर मिळतो जो साइड पॅनल्ससह समोरच्या कव्हरपासून विस्तारित होतो. याशिवाय स्कूटरमधील इतर महत्त्वाच्या बदलांमध्ये ब्लॅक फ्रंट सस्पेंशनसह ब्लॅक इंजिनचा समावेश आहे.

4 / 5
Honda ने स्कूटरच्या LED हेडलँपमध्ये ड्युअल टोन इफेक्ट देखील जोडला आहे आणि त्याला बॉडी कलर ग्रॅब रेल आणि प्रीमियम ग्राफिक्स मिळतात, ज्यामुळे ते खास बनते. तसेच, याच्या टेल लॅम्पवर Activa 125 एम्बॉसिंग आहे.

5 / 5
लाँच झाल्यापासून, Activa हा ब्रँड सातत्याने अपडेट होत आहे. Activa फॅमिलीतील प्रत्येक नवीन व्हेरिएंटसह Honda त्यांच्या प्रोडक्टच्या गुणवत्तेच्या बाबतीत तसेच ग्राहकांचा विश्वास जिंकण्याच्या बाबतीत आघाडीवर आहे. Honda Motorcycle & Scooter India Pvt Ltd चे मॅनेजिंग डायरेक्टर, अध्यक्ष आणि सीईओ अत्सुशी ओगाटा म्हणाले की, “नवीन Activa 125 प्रीमियम व्हेरियंट आपल्या प्रीमियम अपीलसह ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सज्ज आहे."