Car Wiring : एका छोट्या उंदरामुळे होऊ शकतं कारचं 1 लाखापेक्षा जास्त नुकसान, कशी ठेवाल कारची वायरिंग एकदम सेफ
Car Wiring : उंदराचे पुढचे दात आयुष्यभर वाढत असतात, हे दात छोटे ठेवण्यासाठी उंदीर रबर, प्लास्टिक आणि फोम सारख्या नरम वस्तू कुरतडतात. कारच्या बोनेटमधील तारा आणि रबर होज कुरतडण्यासाठी उंदराना सोप्या पडतात.

गाडी चालवताना अचानक चेक इंजिनची लाइट जळणं, सेल्फ स्टार्टचा वेग मंदावणं किंवा एक्सीलेटरने व्यवस्थित काम न करणं हे नेहमीच कुठल्या टेक्निकल प्रॉब्लेममुळे होत नाही. अनेकदा बोनटच्या आत लपलेल्या उंदरांमुळे अशा समस्या येतात. उंदीर कारमधील तारा, रबर होज आणि प्लास्टिक कुरतडून मोठं नुकसान करतात. अनेकदा इंजिनची वायरिंग बदलण्याचा खर्च 25 हजार ते 1 लाखापेक्षा जास्त होतो. कारमध्ये उंदीर का घुसतात? आणि त्यापासून गाडीचं संरक्षण कसं करायचं हे सोप्य उपायांमधून समजून घेऊया.
उंदराचे पुढचे दात आयुष्यभर वाढत असतात, हे दात छोटे ठेवण्यासाठी उंदीर रबर, प्लास्टिक आणि फोम सारख्या नरम वस्तू कुरतडतात. कारच्या बोनेटमधील तारा आणि रबर होज कुरतडण्यासाठी उंदराना सोप्या पडतात.
ऑटोमोटिव रिपेलेंट स्प्रे
कारमधील वायरिंग सुरक्षित ठेवण्यासाठी ऑटोमोटिव रिपेलेंट स्प्रे एक सोपा आणि किफायती उपाय आहे. यात डेनाटोनियम बेंजोएट सारखे एलिमेंट्स असतात. ते सुकल्यानंतर तारांवर आणि पाइपवर असा थर जमवतात ज्याची टेस्ट उंदरांना अजिबात आवडत नाही. ऑटोमोटिव रिपेलेंट स्प्रे लावण्याआधी बोनटचा भाग ड्राय वॉश किंवा फोम क्लीनरने साफ करा. इंजिन थंड झाल्यानंतर खुल्या तारा, फायरवॉल पॅड आणि व्हील आर्च स्प्रेची फवारणी करा. दर दोन-तीन महिन्यांची हा स्प्रे मारा. पावसानंतर पुन्हा मारा.
हा आवाज माणसांना ऐकू येत नाही
अल्ट्रासोनिक रॅट रिपेलेंट आणि स्ट्रोब लाइट ही एक इलेक्ट्रॉनिक डिवाइस आहे. हे डिवाइस 12V बॅटरी किंवा रिचार्जेबल सेलशी तुम्ही जोडू शकता. यातून 20 ते 65 किलोहर्ट्ज जोरात आवाज निघतो. हा आवाज माणसांना ऐकू येत नाही. पण उंदरांना त्यामुळे त्रास होतो. डिवाइस मध्ये चमकणाऱ्या LED स्ट्रोब लाइट सुद्धा आहेत.