
जपानची बाईक उत्पादक Kawasaki India ने 22 सप्टेंबर 2025 रोजीपासून आपली एंट्री लेव्हल आणि मिड रेंज बाईक्सच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. कावासाकी इंडियाने GST 2.0 लागू झाल्यानंतर तरुणाईत लोकप्रिय ठरलेल्या 350cc पर्यंतच्या बाईक स्वस्त केल्या आहेत. नवीन दरामुळे या कावासाकी मोटरसायकलच्या किंमतीत हजार ते 68 हजार रुपयांपर्यंतची कपात झाली आहे. Ninja 300, W175 आणि KLX230 सारखी मॉडल स्वस्त झाली आहेत. पण 350cc वरील बाईक्स महागल्या आहेत. कावासाकी निन्जा 300 या बाईकची किंमत कमी झाली आहे. आता किती आहे किंमत या बाईकची?
एंट्री लेव्हल आणि मिड रेंज बाईक्सवर मोठी बचत
छोट्या इंजिन बाईक स्वस्त
350cc हून कमी इंजिन असलेल्या बाईकच्या किंमती उतरल्या आहेत. तर 350cc वरील मॉडेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. नवीन Ninja 500 (MY25) आता 5.66 लाख रुपयांपासून सुरू होईल. तर टॉप एंड मॉडल Ninja H2 SX SE (MY25) ची किंमत 36.28 लाख रुपयांपर्यंत पोहचेल. या श्रेणीतील बाईकवर कंपनीने 2.34 लाख रुपयांपर्यंतचे ओझे टाकले आहे.
ग्राहकांना फायदा, डिलर्सचे मत काय?
आता एक महिना सणावारांचा असेल. दसरा, दिवाळीत मोठ्या प्रमाणात ग्राहक खरेदी करतात. त्यामुळे छोट्या इंजिन बाईकच्या विक्रीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तर मोठ्या इंजिन असलेल्या बाईक महागल्याने त्याचा विक्रीवर नकारात्मक परिणाम दिसेल. डीलर्सच्या मते येत्या दोन महिन्यात ग्राहकांच्या उड्या पडतील. GST 2.0 मुळे एंट्री लेव्हल बाईक अधिक किफायत दरात उपलब्ध होतील. फेस्टिव्ह ऑफर्सचा फायदा पण ग्राहकांना मिळेल. त्यामुळे एक दमदार बाईक खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्यांना मोठा फायदा होईल.