
मारुती अर्टिगाला (Maruti Ertiga) ला टक्कर देणारी Kia ची नवीन कार किआ कॅरेन्सचं (Kia Carens) उत्पादन सुरु झालं आहे. असं म्हटलं जात आहे की, या महिन्याच्या अखेरीस ही कार बाजारात दाखल होऊ शकते.

ग्राहकांना या कारची बुकिंग करता येणार आहे. किया इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन किंवा डिलरशीप वाल्याकडे जाऊन फक्त 25 हजार रुपये देऊन या कारची बुकिंग करता येईल. ही एक प्रीमियम क्लास असलेली एमपीव्ही कार (Premium MPV car) असून सेव्हन सीटर आहे. याबाबत कंपनीने अधिकृत माहिती दिलेली आहे.

Kia Carens ही कार भारतात एकूण आठ रंगामध्ये उपलब्ध केली जाईल. यामध्ये इम्पीरियल ब्लू, मॉस ब्राउन, स्पार्कलिंग सिल्व्हर, इंटेन्स रेड, अरोरा ब्लॅक पर्ल, ग्रॅव्हिटी ग्रे, ग्लेशियर व्हाइट पर्ल आणि क्लियर व्हाइट अशा रंगांचा समावेश असेल. या कारची डिझाईन भारतात उपलब्ध असलेल्या एमपीव्ही कारपेक्षा वेगळी असेल.

किया कॅरेन्स या कारला कार प्ले अँड्रॉईड ऑटो आणि कियाच्या UVO कनेक्टीव्हीटीसोबत 10.25 इंची टच स्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम मिळेल. या पूर्ण सिस्टिमध्ये 64-कलर अॅम्बिएंट लाईट असलेले आठ स्पिकर्सचे साऊंड सिस्टिम मिळेल.

या कारमधील सिट्संदर्भात बोलायचे झाले तर व्हेंटिलेटेड फ्रन्ट सिट्स, तसेच कप होल्डर्स असलेले सीट बॅक टेबलसुद्धा या कारमध्ये दिले जाईल. मागेच्या ओळीतील सिट्ससाठी इलेक्ट्रिकली पावर्ड वन-टच टम्बल डाउन फीचर असेल. तसेच सिंगल-पॅन सनरूफदेखील या कारमध्ये देण्यात आलेले आहे.