Mahindra : महिंद्राच्या दमदार गाडीचे आणखी एक माॅडेल लाॅन्च, किंमतही अगदी बजेटमध्ये

| Updated on: Apr 25, 2023 | 8:08 PM

महिंद्रा बोलेरो मॅक्समध्ये जिओ फेसिंग, व्हेईकल ट्रॅकिंग, हेल्थ मॉनिटरिंग आणि रूट प्लॅनिंग यासह एकूण 50 वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये iMAXX तंत्रज्ञान देण्यात आले आहे म्हणजे पिक-अप ट्रकचा मालक अॅपद्वारे त्यावर नजर ठेवू शकतो.

Mahindra : महिंद्राच्या दमदार गाडीचे आणखी एक माॅडेल लाॅन्च, किंमतही अगदी बजेटमध्ये
महिंद्रा बोलेरो
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : महिंद्राने नवीन पिक-अप ट्रक लाॅन्च केला आहे. हा पिक-अप ट्रक 12 पर्यायांमध्ये खरेदी केले जाऊ शकतो, हा ट्रक मुख्यतः शहर आणि हेवी ड्युटी कन्टेन आहे. 25,000 रुपये देऊन तुम्ही नवीन पिक-अप ट्रक बुक करू शकता. बोलेरो मॅक्स (Mahindra Bolero Max) पेलोड क्षमतेनुसार (वेट लिफ्टिंग क्षमता) वेगवेगळ्या प्रकारांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. या ट्रकच्या वैशिष्ट्यांमध्ये एलईडी टेललॅम्प, उंची समायोजित करण्यायोग्य ड्रायव्हर सीट आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांचा समावेश आहे. नवीन पिक-अप लॉजिकची वैशिष्ट्ये, इंजिन आणि किंमत याबद्दल तपशीलवार जाणून घेऊ या.

नवीन महिंद्रा बोलेरो मॅक्सचे फीचर्स

महिंद्रा बोलेरो मॅक्समध्ये जिओ फेसिंग, व्हेईकल ट्रॅकिंग, हेल्थ मॉनिटरिंग आणि रूट प्लॅनिंग यासह एकूण 50 वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये iMAXX तंत्रज्ञान देण्यात आले आहे म्हणजे पिक-अप ट्रकचा मालक अॅपद्वारे त्यावर नजर ठेवू शकतो. हे पिक-अप ट्रक 1.2 टन ते 2 टन वजन उचलू शकतात. त्याच्या कार्गो बेडची लांबी 2500 मिमी ते 3050 मिमी पर्यंत आहे.

नवीन महिंद्रा बोलेरो मॅक्स इंजिन

नवीन बोलेरो पिक-अप ट्रकमध्ये 2.5-लिटर डिझेल इंजिन आहे. या इंजिनची कमाल पॉवर 81 PS आहे आणि 220 Nm पर्यंत पीक टॉर्क देऊ शकतो. त्याचे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. या पिक-अप ट्रक मध्ये सीएनजी पर्यायही दिला आहे.

हे सुद्धा वाचा

नवीन महिंद्रा बोलेरो  मॅक्सची  किंमत

नवीन महिंद्रा बोलेरो मॅक्सच्या सिटी व्हेरियंटची किंमत 7.85 लाखांपासून सुरू होते आणि 8.34 लाखांपर्यंत जाते. तर, हेवी ड्युटी मॉडेल रु.9.26 लाखांपासून सुरू होते आणि रु.10.33 लाखांपर्यंत जाते. या बोलेरो ट्रकच्या सिटी सीएनजी प्रकाराची किंमत ८.२५ लाख रुपये आहे. या सर्व किंमती एक्स-शोरूमनुसार आहेत.