Mahindra Thar प्रेमींसाठी वाईट बातमी, कंपनीनं प्रसिद्ध गाडीबाबत घेतला असा निर्णय

Mahindra Thar : महिंद्रा कंपनीच्या थार गाडीनं अल्पावधीतचं लोकप्रियता मिळवली आहे. मात्र आता कंपनीच्या एका निर्णयामुळे कारप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. नेमकं काय केलं आहे जाणून घेऊयात

Mahindra Thar प्रेमींसाठी वाईट बातमी, कंपनीनं प्रसिद्ध  गाडीबाबत घेतला असा निर्णय
Mahindra Thar : महिंद्रा कंपनीचा मोठा निर्णय, आता लोकप्रिय थार गाडी घेणं म्हणजे...Image Credit source: Mahindra
Follow us
| Updated on: Apr 13, 2023 | 5:18 PM

मुंबई : महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या गाड्यांना भारतीय बाजारात मोठी मागणी आहे. गेल्या काही महिन्यात महिंद्रा थार गाडी चांगलीच लोकप्रिय झाली आहे. इतकंच काय तर या गाडीसाठीचा वेटिंग पीरियडही आहे. त्यामुळे गाडी मिळवण्यासाठी ग्राहकांना काही काळ वाट पाहावी लागते. असं असताना कंपनीचा एक निर्णय ग्राहकांना चांगलाच महागात पडणार आहे. कारण महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने लोकप्रिय एसयुव्ही महिंद्रा थारच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कंपनीने या गाडीची किंमत 1 लाख 5 हजार रुपयांनी वाढवली आहे. चला जाणून घेऊयात गाडीची किंमत वाढवण्याचं नेमकं कारण

महिंद्रा थार किंमत

कंपनीने गाडीची किंमत वाढवल्यानंतर महिंद्र थार एक्स (ओ) हार्ड टॉप डिझेल एमटी आरडब्ल्यूडी व्हेरियंट ग्राहकांना 55 हजार रुपये अतिरिक्त मोजावे लागतील. त्याचबरोबर महिंद्रा थारच्या एलएक्स हार्ड टॉप डिझेल एमटी आरडब्ल्यूडी व्हेरियंटसाठी 1 लाख 5 हजार जास्तीचे द्यावे लागतील. या व्यतिरिक्त महिंद्राच्या थारच्या अन्य व्हेरियंटच्या किमतीत 28 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

महिंद्रा थार एलएक्स हार्ड टॉप डिझेल एटी 4डब्ल्यूडीचं टॉप व्हेरियंट आता 16 लाख 77 हजार (एक्स शोरुम) किमतीत उपलब्ध आहे. दुसरीकडे बेस व्हेरियंटच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. बेस व्हेरियंट आता 13 लाख 49 हजार (एक्स शोरुम) रुपयात मिळत आहे.

महिंद्रा थारच्या किमतीत म्हणून वाढ

रिपोर्टनुसार महिंद्रा थारच्या लोकप्रिय गाडीच्या किमती वाढण्यामागचं मुख्य कारण, नवीन बीएस 6 2.0 आणि आरडीई एमिशन नियम आहेत. सध्या कंपनी आपले मॉडेल्स नव्या एमिशन नियमांनुसार अपडेट करत आहे. त्यामुळे काही गाड्यांच्या किमतीत वाढ केली आहे.

थारचं नवं व्हेरियंट येण्याची शक्यता

रिपोर्टनुसार, महिंद्रा कंपनी लवकरच थारचं नवं व्हेरियंट लाँच करण्याची शक्यता आहे. ऑटो एक्स्पो 2023 इव्हेंटमध्ये मारुती सुझुकीने अपकमिंग जिम्नी एसयुव्ही सादर केली होती. या गाडीशी स्पर्धा करण्यासाठी कंपनी थारचं नवं व्हेरियंट लाँच करण्याच्या तयारीत आहे.

स्वस्त महिंद्रा थार 4×4 आणणार

कंपनी थारच्या फोर व्हील ड्राईव्ह (4×4) सिस्टमनुसार स्वस्त व्हेरियंट बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. महिंद्रा थार सध्या एएक्स (ओ) आणि एलएक्स या ब्रॉड व्हेरियंटमध्ये येते. यात दोन पेट्रोल आणि एक डिझेल इंजिन पर्याय आहे.नवं आणि स्वस्त व्हेरियंट एएक्स एसी नावाने येईल आणि यात कंपनी 2.2 लिटर डिझेल आणि 2.0 लिटर पेट्रोल इंजिन सादर करू शकते.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.