पॉवरफुल एसयूव्ही Mahindra XUV 500 लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

| Updated on: Feb 20, 2021 | 12:54 PM

Mahindra ची सेकेंड जनेरेशन XUV 500 टेस्टिंगच्या अंतिम टप्प्यात आहे. ही कार लवकरच भारतात लाँच केली जाण्याची शक्यता आहे.

पॉवरफुल एसयूव्ही Mahindra XUV 500 लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Follow us on

मुंबई : Mahindra ची सेकेंड जनेरेशन XUV 500 टेस्टिंगच्या अंतिम टप्प्यात आहे. ही कार भारतात यावर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत लाँच केली जाण्याची शक्यता आहे. महिंद्रा XUV500 तिच्या सेगमेंटमध्ये सर्वात पॉवरफुल एसयूव्ही ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Mahindra XUV 500 to be most powerful suv in the segment)

टर्बो पेट्रोल इंजिन मिळणार

महिंद्राच्या या एसयूव्हीमध्ये नवीन 2.0L mStallion टर्बो पेट्रोल आणि 2.2 लीटर डिझेल इंजिन दिलं जाणार आहे. XUV 500 ची 2.0 लीटर mStallion गॅसोलीन मोटर 190bhp पॉवर आणि 350Nm टॉर्क जनेरेट करते.

या गाड्यांना जोरदार टक्कर

महिंद्रा एक्सयूव्ही या कारला भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये इतर वाहनांकडून जोरदार टक्कर मिळणार आहे. त्यातही प्रामुख्याने एमजी हेक्टर प्लस आणि टाटाची आयकॉनिक कार टाटा सफारी या गाड्यांना एक्सयूव्ही 500 ला टक्कर द्यावी लागणार आहे.

महिंद्राचा इलेक्ट्रिक मोबिलिटीवर फोकस

महिंद्रा यावर्षी पॉप्युलर कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये Mahindra eKUV100 आणि Mahindra eXUV300 लाँच करणार आहे. या दोन्ही कार गेल्या वर्षीच्या ऑटो एक्स्पोमध्ये पाहावयास मिळाल्या होत्या. त्यानंर कंपनी New Mahindra Treo, Treo Zor सह Mahindra Atom electric quadricycle देखील लाँच करणार आहे. महिंद्रा कंपनी येत्या काळात इलेक्ट्रिक मोबिलिटीवर अधिक जोर देणार आहे. तसेच देशातही गेल्या वर्षभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे.

Mahindra ची स्वस्त Scorpio लवकरच बाजारात

महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) कंपनी ऑल-न्यू स्कॉर्पियोच्या (All New Scorpio) लाँचिंगसाठी जोरदार तयारी करत आहे. महिंद्राची ही बहुप्रतीक्षित कार जून 2021 च्या आसपास लाँच केली जाण्याची शक्यता आहे. या नव्या Scorpio चे फोटो पाहून लक्षात येईल की, ही कार जुन्हा Scorpio पेक्षा थोडी मोठी आणि बोल्ड असेल.

ऑल-न्यू स्कॉर्पियो या कारमध्ये कंपनीने काही बदल केले आहेत. आगामी स्कॉर्पियो नवीन लॅडर-फ्रेम चेसीवर आधारित असेल. या कारच्या लीक झालेल्या फोटोवरुन अंदाज बांधला जातोय की, आगामी स्कॉर्पियोमध्ये सध्याच्या स्कॉर्पियोच्या तुलनेत मोठं फुटप्रिंट असेल, हे नवीन फ्रंट ग्रिलने लेस असेल. यामध्ये वर्टिकल स्लॅट्ससह मध्यभागी कंपनीचा लोगो असेल.

कशी आहे नवी Scorpio?

स्कॉर्पियोच्या नवीन हेडलॅम्प्सना रीमॉडेल्ड ट्विन-पॉड हेडलॅम्प्सद्वारे फ्लँक केले जातील. बोनेट थोडं लांब असेल आणि एक नवीन फ्रंट बम्परही दिलं जाईल. मागच्या बाजूचं टेलगेटही मोठं असेल. एलईडी टेललाइट्स आणि रूफ-माउंटेड स्टॉप लँपसह येईल. असं म्हटलं जातंय की कंपनी ही कार 12 लाख रुपये इतक्या किंमतीत लाँच करु शकते. ही या लाईनअपमधील सर्वात स्वस्त कार असेल.

महिंद्राची नेक्स्ट जनरेशन New Scorpio ही गाडी ZEN3 प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. नव्या महिंद्रा स्कॉर्पियोच्या नव्या डिझाईनमध्ये, ज्यादा जागा, नवा इंटेरियर लूक आणि लांब व्हीलबेसच्या सह लाँच केले जाणार आहे. या कारमध्ये 2.2 लीटर टर्बोचार्ज्ड डीझेल आणि 2.0 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन असेल. यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमेटिक ट्रांन्समिशन सुविधा उपलब्ध असेल.

स्कॉर्पियोचं अपडेटेड मॉडलसुद्धा आधी प्रमाणे 7 स्लॉट ग्रिल, मोठे प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी गाइड लाइट्स, क्रोम एक्सेट्स सोबत राउंड फॉग लॅम्प्स, हुड स्कूप, 5 स्पोक 17 इंच अलॉय व्हिल्ज, टर्न इंडिकेटर्स सोबत आउट साइट रियर व्ह्यू मिरर्स आणि रेड लेन्स एलईडी टेल लॅम्प्स सोबत येते.

महिंद्रा स्कॉर्पियो मध्ये BS6 कम्प्लायंट 2.2-लीटर mHawk डिझेल इंजिन मिळणार आहे. जे 138bhp चे पॉवर आणि 320 Nm पीक टॉर्क जनरेट करते. एस 5 व्हेरियंटमध्ये या इंजिन सोबत 5 स्पीड मॅन्यूअल, तर अन्य व्हेरियंट सोबत 5 स्पीड मॅन्यूअल गियरबॉक्स मिळणार आहे. बीएस 6 मॉडल मध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे ऑप्शन दिले नाही.

इतर बातम्या

Seltos, Creta ला जोरदार टक्कर, MG ची नवी SUV लाँच होणार

ह्युंदायचा इलेक्ट्रिक SUVs चा धडाका, भारतात 3200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

Nissan Magnite की Renault Kiger कोणती कार आहे अधिक दमदार?

Skoda च्या नव्या कारची पहिली झलक सादर, मेड इन इंडिया SUV 18 मार्चला बाजारात

(Mahindra XUV 500 to be most powerful suv in the segment)