ह्युंदायचा इलेक्ट्रिक SUVs चा धडाका, भारतात 3200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

ह्युंदाय कंपनी भारतात अनेक इलेक्ट्रिक वाहनं लाँच करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. (Hyundai Motor Company)

ह्युंदायचा इलेक्ट्रिक SUVs चा धडाका, भारतात 3200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

नवी दिल्ली : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, ह्युंदाय कंपनी भारतात अनेक इलेक्ट्रिक वाहनं लाँच करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. कंपनी त्यासाठी तब्बल 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. (Hyundai lines up to 3200 cr to ramp up india portfolio)

ह्युंदाय कंपनी भारतातला त्यांचा उत्पादन पोर्टफोलिओ आणि कार लाँचिंगचं प्रमाण वाढवण्यासाठी 3200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनी आता ग्रीन मोबिलिटीमध्ये गुंतवणूक करणार आहे. जेणेकरून लोकल ऑपरेशन्स मजबूत होऊ शकतील. कंपनी आगामी काळात अनेक वाहनं लाँच करण्याच्या तयारीत आहे. या यादीमध्ये अनेक इलेक्ट्रिक वाहनांचादेखील समावेश आहे. दक्षिण कोरियन कार निर्मात्या कंपनीने भारतात 25 वर्षे पूर्ण केली आहेत आणि देशांतर्गत प्रवासी वाहन बाजारात (पँसेंजर व्हीकल मार्केट) कंपनीचा एकूण 17 टक्के वाटा आहे.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एसएस किम म्हणाले की, भविष्यात चांगल्या वृद्धीसाठी इलेक्ट्रिक मोबिलिटी हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. भविष्यात प्रॉडक्ट लाइनअपमध्ये अशा अनेक मेड इन इंडिया इलेक्ट्रिक कार असतील ज्या अतिशय कमी किंमतीत बनवल्या जातील. यासाठी कंपनी 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

कंपनीचा फोकस इलेक्ट्रिक कारवर

कंपनी सध्या इलेक्ट्रिक कारसाठी लोकलायझेशनची योजना तयार करीत आहे. यासाठी, ह्युंदाय किआबरोबर (Kia Motors) भागीदारी करू शकते. त्यानंतर ग्रीन्सच्या देशांतर्गत उत्पादनांच्या मदतीने इतर कंपन्यांशी स्पर्धा करू शकते. ह्युंदाय सध्या भारतात कोना ई या एसयूव्हीची विक्री करते, या कारची किंमत 24 लाख रुपये इतकी आहे.

किम यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, कंपनीकडे भारतात ग्लोबल EV सुरू करण्याचा पर्याय आहे. याक्षणी आम्ही अशा मॉडेल्सवर काम करीत आहोत जी लुक्स आणि किंमतीच्या बाबतीत लोकांची पहिली पसंती ठरेल. आम्हाला लोकांना परवडेल असं काहीतरी द्यायचं आहे. अशा परिस्थितीत आम्ही सध्या बर्‍याच प्रकल्पांवर काम करीत आहोत, जिथे आम्हाला असं वाटतं की इलेक्ट्रिफिकेशन हा आपला महत्वाचा आधारस्तंभ होईल.

SUV सारखा लुक असणार

किम म्हणाले की, आम्ही पहिली लोकल इलेक्ट्रिक कार विकसित करीत आहोत. पण यावेळी किम यांनी त्यांच्या नव्या ईव्हीबाबत इतर कोणतीही माहिती दिली नाही. कंपनीमधील आमच्या काही सूत्रांनी सांगितले की, ही एक एसयूव्ही असेल, कारण बाजारात सध्या एसयूव्हींचा ट्रेंड सुरु आहे.

भारत केंद्रीय व राज्य पातळीवर इलेक्ट्रिक्ससाठी बरेच लाभ प्रदान करतो. पेट्रोल आणि डिझेल कार्सच्या तुलनेत भारत सरकार खूप कमी जीएसटी आकारतो. पेट्रोल आणि डिझेल कार्सवर 28 टक्के तर इलेक्ट्रिक कार्सवर केवळ 5 टक्के जीएसटी आकारला जातो. सोबतच देशातील अनेक राज्य सरकार इलेक्ट्रिक्सवर रस्ते आणि नोंदणी शुल्क आकारत नाही.

हेही वाचा

Honda ची आफ्रिका ट्विन अ‌ॅडव्हेन्चर भारतात दाखल, जाणून घ्या नवे फिचर्स

कनेक्टेड टेक्नोलॉजीसह Yamaha च्या 2021 FZ FI आणि FZS FI बाईक भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

केवळ 1.5 युनिटमध्ये फुल चार्ज, Komaki ची हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, किंमत फक्त…

Renault Kiger चं कोणतं वेरिएंट तुमच्या खिशाला परवडेल? जाणून घ्या सर्व किंमती

(Hyundai lines up to 3200 cr to ramp up india portfolio)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI