
प्रीमियम हॅचबॅक कारची विक्री एक सारखी आहे, परतू मारुती बलेनो ऑगस्ट २०२५ ची सर्वात जास्त विक्री झालेली कार बनली आहे. या कारची विक्रीचे आकडे सध्याच्या तिच्या स्पर्धक इतर कारच्या एकूण विक्रीच्या बरोबरीचे आहेत. हुंडई आय २० ची महिन्याची वाढ पॉझिटीव्ह नोदंली गेली आहे. परंतू हीच्या वार्षिक विक्रीत सर्वात जास्त घसरण झाली आहे. चला तर या संदर्भात विस्ताराने पाहूयात…
Maruti Baleno
मारुती बलेनो कार १२,५०० हून अधिक युनिट्स विक्रीसह ऑगस्ट महिन्याची सर्वाधिक विक्रीची प्रीमियम हॅचबॅक कार बनली आहे. या कारची मासिक विक्रीत कोणताही फरक दिसलेला नाही. परंतू हीच्या वार्षिक विक्रीत १ टक्क्यानी वाढ नोंदवली गेली आहे. भारतीय बाजारात मारुती बलेनोची एक्स शोरुम किंमत ६.७४ लाख रुपयाने सुरु होऊन ९.९६ लाख रुपयांपर्यंत जात आहे.यात ड्युअल फ्रंट एअरबॅग, एबीएस ( एंटी -लॉक ब्रेकींग सिस्टीम ) सह EBD, ISOFIX चाईल्ड सीट माऊंट, हाय स्पीड वार्निंग अलर्ट आणि रिव्हर्स पार्किंग सेंसर देखील मिळत आहे.
Toyota Glanza
ऑगस्ट २०२५ मध्ये टोयोटा ग्लॅझा दुसऱ्या क्रमाकांची सर्वाधिक विक्री होणारी प्रीमियम हॅचबॅक कार ठरली आहे. गेल्या महिन्यात या कारची ५,१०० हून अधिक युनिट्सची विक्री झाली. या हॅचबॅक कारचा मासिक सेल्समध्ये २ टक्क्यांपर्यंत वाढ झाली, तर वार्षिक सेलमध्ये १० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. टोयाटा ग्लॅझाची एक्स शोरुम किंमत सुमारे ६.९९ लाख ते १० लाख दरम्यान आहे. यात टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, मल्टी-फंक्शन स्टीअरिंग व्हील, आणि ६ एअरबॅग सारखे फिचर्स मिळतात.
Tata Altroz
टाटा अल्ट्रोझ फेसलिफ्ट लिस्टमध्ये तिसऱ्या पोझिशन वर राहीली. गेल्या महिन्यात या हॅचबॅक कारची ४,००० हून कमी युनिट्स विकल्या गेल्या. या गाडीची मंथली सेल्स १ टक्के वाढले आहे. तर वार्षिक सेलमध्ये ३१ टक्के वाढ झाली आहे. भारतीय बाजारात हीची एक्स शोरुम किंमत ६.८९ लाख रुपयानी सुरु होते आणि टॉप व्हेरिएंटची किंमत ११.२९ लाख रुपयांपर्यंत जाते. या नवीन डॅशबोर्ड लेआऊट, अपडेटेड लायटिंग, मोठे इंन्फोटेनमेंटस सिस्टीम, ३६० डिग्री कॅमेरा आणि व्हॉईस – असिस्टंड सनरुफ मिळतो.
Hyundai i20
हुंडई आय २० ( आय २० एन लाईन सह ) गाडीचे ३,६०० युनिट्सची विक्री होऊन चौथी सर्वाधिक विक्री होणारी प्रिमीयम हॅचबॅक कार बनली आहे. हीची मासिक विक्री ७ टक्के वाढली आहे. तर वार्षिक सेल्समध्ये २६ टक्के घसरण झाले आहे. हुंडई i20 ची एक्स -शोरुम किंमत ७.५१ लाख ते ११.३५ लाख रुपयांदरम्यान आहे.यात एलईडी हँडलाईट्स, टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम, आणि एलईडी टेल लाईट्स सारखे फिचर्स आहेत.