
मारुती सुझुकी इंडियाने या महिन्यात ऑक्टोबर 2025 पासून आपल्या कारवर डिस्काऊंट ऑफर करणे सुरु केले आहे. तसेच या कारवर जीएसटी कपातीचा फायदा मिळणार आहे. यात कंपनीची सर्वात पसंत केली जाणारी नंबर – 1 कार वॅगनआरचा देखील समावेश आहे.या महिन्यात दिवाळीच्या मुहूर्तावर या कार खरेदीवर 75 हजार रुपयांचे लाभ दिले जात आहेत. यात कॅश डिस्काऊंट्सह स्क्रॅपेज अलाऊन्स आणि इंसेटिव्ह सामील आहे.
जीएसटी कपातीनंतर मारुती वॅगनआर ( Maruti WagonR ) च्या LXI वॅरिएंटची एक्स शोरुम किंमत 5 लाख 78 हजार 500 रुपये होती. आता ही या कारच्या किंमतीत 79 हजार 600 रुपयांची कपात केली आहे. अशात आता Maruti WagonR ची किंमत आता 4 लाख 98 हजार 900 रुपये झाली आहे. मारुती वॅगनआरची स्पर्धा खास करुन Tiago, Citroen C3, Maruti Celerio आणि मारुती Alto K10 सारख्या कारशी आहे.
Maruti WagonR मध्ये तीन इंजिनाचे पर्याय मिळतात. 1.0 लिटर पेट्रोल, 1.2 लिटर पेट्रोल आणि 1.0 लिटर पेट्रोल + CNG असे हे तीन पर्याय आहेत. हीचे पेट्रोल व्हर्जन 25.19 किलोमीटर प्रति लिटर पर्यंतचे मायलेज देते. तर सीएनजी व्हर्जन 34.05 Km/kg पर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे. यात मॅन्युअल आणि ऑटोमेटिक दोन्ही ट्रान्समिशनचे ऑप्शन उपलब्ध आहे. त्यामुळे ही कार शहर आणि हायवे दोन्ही जागी आरामात चालवता येते.
फिचर्सबाबत विचारायचे तर WagonR मध्ये 7-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम मिळते. ही सिस्टीम Android Auto आणि Apple CarPlay ला सपोर्ट करते. या किलेस एंट्री, पॉवर विण्डोज आणि 341 लिटरचा मोठी बूट स्पेस देखील देण्यात आला आहे. सुरक्षेच्या बाबतीत आता WagonR पहिल्यापेक्षा जास्त सुरक्षित झाली आहे.कारण या कारमध्ये आता 6 एअरबॅग्स स्टँडर्ड मिळत आहेत. याशिवाय ABS च्या सह EBD,इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम (ESP),रिअर पार्किंग सेन्सर आणि रिअर कॅमेरा सारख्या सुविधा देखील दिल्या आहेत.
मारुती वॅगनआरची सुरुवातीची एक्स -शोरुम किंमत 5.78 लाख रुपयांपासून सुरु होत ती7.62 लाख रुपयांपर्यंत जाते. जर हिच्या बेस व्हेरिएंटला दिल्लीत खरेदी केले तर रजिस्ट्रेशनचे 24 हजार रुपये आणि इंश्योरन्सचे 22 हजार रुपये द्यावे लागतील. अन्य चार्जेस म्हणून 5685 रुपये द्यावे लागतील. त्यानंतर हीची ऑनरोड किंमत 6.30 लाख रुपये होईल.