मारुतीची नवी कोरी सनरुफ असलेली पहिलीच एसयुव्ही, 8 ते 12 लाखांपर्यंत असणार किंमत

| Updated on: Jun 24, 2022 | 1:04 PM

मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आपली एसयुव्ही (SUV) ब्रेझाला लवकर नवीन क्लेवरसह बाजारात आणण्याच्या तयारीमध्ये आहे. ही मारुतीची पहिली सनरुफ असलेली एसयुव्ही कार ठरणार असून, या शिवाय याच्या इंटीरियर लूकमध्येही (Interior look) अनेक बदल करण्यात आले आहेत.

मारुतीची नवी कोरी सनरुफ असलेली पहिलीच एसयुव्ही, 8 ते 12 लाखांपर्यंत असणार किंमत
Follow us on

मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आपली एसयुव्ही (SUV) ब्रेझाला लवकर नवीन क्लेवरसह बाजारात आणण्याच्या तयारीमध्ये आहे. ही मारुतीची पहिली सनरुफ असलेली एसयुव्ही कार ठरणार असून, या शिवाय याच्या इंटीरियर लूकमध्येही (Interior look) अनेक बदल करण्यात आले आहेत. यामुळे ही नवीन कार अजूनच खास बनते. मारुती सुझुकीकडून नवीन ब्रेझाचे दोन फोटो देखील रिलीज करण्यात आले असून या माध्यमातून कारच्या इंटीरियर आणि डिझाईनच्या बाबतीत देखील अनेक गोष्टींचा उलगडा झालेला आहे. नवीन मारुती ब्रेझाच्या इतर काही फीचर्स, इंटीरिअरबाबत या लेखातून माहिती जाणून घेणार आहोत.

बुकिंगला झाली सुरुवात

रिपोर्टनुसार, मारुती सुझुकी ब्रेझाच्या या अपडेटेड व्हर्जनला लवकरच बाजारात आणले जाणार आहे. त्यासाठी याची बुकिंगही सुरु करण्यात आली आहे. जर तुम्हीदेखील मारुतीची ही कार खरेदी करण्याच्या विचारामध्ये असाल तर, तुम्ही केवळ 11 हजार रुपये जमा करुन या कारची बुकिंग करु शकणार आहात.

दमदार इंफोटेनमेंट सिस्टीम

नवीन मारुती ब्रेझाचे इंफोटेनमेंट सिस्टीम स्मार्ट होण्यासह प्रो प्लस होणार आहे. यात डेट टाइमसह एव्हरेज स्पीड आणि ड्राइव्हिंग टाइमच्या बाबत माहिती देण्यात आली आहे. यात फोन करणे आणि आलेला फोन घेणे अधिक सोपे करुन देण्यात आलेले आहे.

पहिल्यांदाच मिळणार सनरुफ

मारुतीच्या या नवीन एसयुव्ही ब्रेझामध्ये इलेक्ट्रिक सनरुफ देण्यात आलेले असून मारुतीच्या कुठल्याही कारमध्ये हे सनरुफ असलेले पहिलेच मॉडेल ठरणार आहे. या शिवाय स्पीड, ट्रांसमिशन, हायब्रिड इंजिन आदीदेखील या कारमध्ये उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे स्पर्धक कार्सच्या तुलनेत नवीन ब्रेझामध्ये अनेक नवीन फीचर्स देण्याचा प्रयत्न कंपनीकडून करण्यात आला आहे.

अनेक सेफ्टी फीचर्स

नवीन ब्रेझाच्या सेफ्टी फीचर्समध्ये अनेक बदल करण्यात आलेले आहेत. यात ग्राहकांसाठी 6 एअरबेग, इलेक्ट्रिक स्टेबिलिटी कंट्रोल तसेच टायर प्रेशर मॉनीटरिंग सारखे दमदार सुरक्षा फीचर्स देण्यात आलेले आहेत. नवीन ब्रेझा कारमध्ये फ्रेश एक्सटीरियर बघायला मिळणार असून पाच स्पीड मॅन्यूअल गिअर बॉक्स बघायला मिळणार आहे. यात, 1.5 लीटर 4 सिलेंडर K15 सी ड्युअल जेट इंजिन देण्यात आले आहे.

काय असणार किंमत

एका रिपोर्टनुसार, नवीन ब्रेझाची किंमत विटारा ब्रेझापेक्षा जास्त असणार आहे. परंतु दुसर्या एका रिपोर्टनुसार, ब्रेझाची किंमत 8 ते 12 लाख रुपयांच्या दरम्यान राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.