AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेची उडाली झोप, थेट अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांच्या घरातच ड्रोन, तात्काळ बैठक, अज्ञातस्थळी…

अमेरिका आणि इराण युद्धात अमेरिकेला मोठा दणका बसताना दिसत आहे. थेट झोप उडवणारी बातमी पुढे येत आहे. अमेरिकेची सुरक्षा धोक्यात आली. नुकताच एका महत्वाच्या लष्कर तळावर थेट ड्रोन घिरट्या घालताना दिसले.

अमेरिकेची उडाली झोप, थेट अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांच्या घरातच ड्रोन, तात्काळ बैठक, अज्ञातस्थळी...
Pete Hegseth, US Secretary of State Marco Rubio
| Updated on: Mar 19, 2026 | 11:17 AM
Share

इस्त्रायल आणि अमेरिका इराणवर हल्ले करत आहेत. इराणकडून या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले जात आहे. इराणच्या गॅस सुविधांवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर मोठी खळबळ उडाली. इराणकडूनही युएई आणि कतारच्या गॅस प्रकल्पांवर हल्ला करण्यात आल्याने जग संकटात आले. आता युद्ध खतरनाक पेटलेले असतानाच अमेरिकेने एक पाऊस मागे घेत इस्त्रायल आता हल्ला करणार नसल्याचे सांगितले. संपूर्ण मध्य-पूर्वेत तणाव निर्माण झाला असून जागतिक ऊर्जा संकट अधिक गंभीर होत आहे. इस्रायलने इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना ठार केले. आखाती देशांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे अमेरिकेवर दबाव आहे. इराणचे स्पष्ट म्हणणे आहे की, आमच्या ऊर्जा प्रकल्पावर हल्ला करण्यात आल्याने आम्ही आता शांत बसणार नाहीत. यूएई आणि कतारवर हल्ले करणार. त्यानंतर मोठे हल्ले करण्यात आली. आता अमेरिकेतही मोठा हाहाकार उडाला आहे. अमेरिकेला या युद्धात मोठा धक्का बसला. अमेरिका हाय अलर्ट मोडवर आहे.

इराण आणि इस्त्रायल युद्धाचे ढग अमेरिकेपर्यंत पोहोचले आहेत. थेट अमेरिकन लष्कराच्या तळावर एक ड्रोन घिरट्या घालताना दिसते. धक्कादायक म्हणजे ज्या लष्कर तळावर ड्रोन दिसले, त्यावेळी त्याच लष्कर तळावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या अत्यंत जवळचे व्यक्ती होते. वॉशिंग्टन पोस्टच्या एका अहवालानुसार, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो आणि संरक्षण मंत्री पीट हेगसेथ तिथे उपस्थित होते.

वॉशिंग्टनमधील पोर्ट मॅकनेअर लष्करी तळावर ड्रोन दिसले. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो आणि संरत्रण मंत्री सचिव पीट हेगसेथ यांच्या निवासस्थानाजवळ हे ड्रोन घिरट्या घालताना दिसले. ड्रोन दिसल्यानंतर अधिकाऱ्यांनी लगेचच महत्वाची बैठक घेतली आणि मार्को रुबियो आणि युद्ध सचिव पीट हेगसेथ यांना इतरत्र हलवण्याचा निर्णय घेतला.

आता मार्को रुबियो आणि पीट हेगसेथ यांनी नक्कीच कुठे हलवण्यात आले, त्याबद्दल फार काही माहिती मिळू शकली नाही. मात्र, या घटनेने अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेपर्यंत इराणचे ड्रोन पोहोचले का? हा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. इराणसोबतच्या युद्धात अमेरिकाच संकटात सापडल्याचे बघायला मिळत आहे.

Follow Us
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले