AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शाळा’ फेम अंशुमनची हटके लव्ह-स्टोरी; इंडस्ट्रीतला नवरा नकोच, अशी अपूर्वाची होती अट

अंशुमन जोशी आणि अपूर्वा गोरे यांची लव्ह-स्टोरी कशी आहे, त्यांची पहिली भेट कशी झाली होती, याविषयी त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे. पुण्यात या दोघांनी लग्नगाठ बांधली असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

'शाळा' फेम अंशुमनची हटके लव्ह-स्टोरी; इंडस्ट्रीतला नवरा नकोच, अशी अपूर्वाची होती अट
अंशुमन जोशी आणि अपूर्वा गोरेImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 19, 2026 | 11:02 AM
Share

‘शाळा’ या चित्रपटात मुकुंदची भूमिका साकारलेला अभिनेता अंशुमन जोशी याने नुकतीच अभिनेत्री अपूर्वा गोरेशी लग्न केलं. पुण्यातील झपूर्झा कला आणि संस्कृती संग्रहालयात हा लग्नसोहळा पार पडला होता. या दोघांची पहिली भेट कशी झाली, त्यांची लव्ह-स्टोरी काय आहे, याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशातच अंशुमन आणि अपूर्वाने नुकतीच एक मुलाखत दिली असून त्यात त्यांनी पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. अपूर्वाला अभिनय क्षेत्रातील नवरा नको होता, परंतु अंशुमनला भेटल्यानंतर तिचे विचार बदलले.

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत अपूर्वाने सांगितलं, “मला माझ्या क्षेत्रातील व्यक्तीशी लग्न करायचं नव्हतं. त्यामुळे मी तसाच मुलगा शोधत होते. अंशुमन आणि माझी ऑनलाइन ओळख झाली आणि जेव्हा त्याने मला भेटुयात का असं विचारलं, तेव्हा एकाच इंडस्ट्रीतले म्हणून मी भेटायला गेले. अभिनयक्षेत्रातच काम करतो, त्यामुळे कधी ना कधी भेट होईलच, असा विचार करत नाही नको म्हणायला म्हणून मी त्याला भेटले. त्यावेळी माझ्या डोक्यात लग्नाचा काहीच विचार नव्हता. मी सहजच भेटायला गेले. आश्चर्याची बाब म्हणजे पहिल्याच भेटीत आम्ही तब्बल सहा तास गप्पा मारल्या होत्या.”

View this post on Instagram

A post shared by Apurva (@apurvagore)

“अंशुमनने मला लग्नाबद्दल माझे विचार काय आहेत, याबद्दल विचारलं. त्यानंतर तो मला घरी सोडायला आला. आम्ही जेव्हा माझ्या घराखाली पोहोचलो, तेव्हा अचानक पाऊस सुरू झाला. तेव्हा माझ्या मनात विचार आला की, हाच संकेत असेल का? खरंतर आम्हा दोघांनाही चॅटिंगपेक्षा फोनवर थेट बोलायला आवडतं. पण त्या भेटीनंतर आम्ही संपूर्ण रात्र एकमेकांशी चॅट करत होतो. त्यानंतर आठवडाभर आम्ही खूप बोललो. एकाच इंडस्ट्रीत काम करणारे आहोत, ही एक अढी होती. त्याविषयी मी त्याला सांगितलं. तेव्हा तो म्हणाला की आपलं लग्न होईल किंवा मग चांगली मैत्री होईल. त्यानुसार आधी चांगली मैत्री झाली आणि त्यानंतर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला”, अशा शब्दांत अपूर्वा व्यक्त झाली.

2025 मध्ये अंशुमन आणि अपूर्वाची पहिली भेट झाली होती. पहिल्या भेटीच्या वर्षभरातच त्यांनी कुटुंबीयांच्या संमतीने लग्नाचा निर्णय घेतला. कितीही अडचणी आल्या तरी मी अपूर्वासोबतच राहीन, अशी भावना मनात निर्माण झाल्याचं अंशुमनने यावेळी सांगितलं.

Follow Us
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला.
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?.
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट.
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस.
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू.
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद.
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप.
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ....
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ.....
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?.